Cotton Pest : कापसातील गुलाबी बोंडअळीला रोखण्याचे सोपे उपाय

Team Agrowon

कपाशी फूल अवस्थेमध्ये असताना डोमकळ्या किंवा अर्धवट उमललेली फुले दिसत असतील तर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय असं समजावं.

Cotton Pest | Agrowon

ज्याठिकाणी कपाशी ची वेळेवर लागवड झालीय अशा ठिकाणी कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत आहेत. अशा ठकाणी ढगाळ वातावरणामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग फिरताना दिसतात.

Cotton Pest | Agrowon

मादी पतंग कपाशीचे पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात. त्यामुळे पुढील काळात कपाशीत गुलाबी बोंडअळी वाढू शकते.

Cotton Pest | Agrowon

प्रादुर्भाव वाढू द्यायचा नसेल तर कपाशीचं नीट निरीक्षण करुन गुलाबी बोंडअळी असलेल्या डोमकळ्या तोडा. या डोमकळ्या जाळून किंवा जमिनीत पुरून नष्ट करा.

Cotton Pest | Agrowon

गुलाबी बोंडअळीसाठी मिळणारे कामगंध सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावा.

Cotton Pest | Agrowon

कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे लावावे लागतात. हे पक्षी थांबे घरच्याघरी कमी खर्चात दोन काठ्या एक उभी आणि एक आडवी काठी बांधून तयार करता येतात. म्हणजे पक्षी या थांब्यावर बसून शेतातील अळया खातील.

Cotton Pest | Agrowon

एक एकर साठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीनची १५०० पीपीएम ५०० मिली या प्रमाणात फवारणी करावी. अशा प्रकारे गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आत्तापासूनच खबरदारी घेऊन उपाय केल्यास पुढे होणार नुकसान टाळता येतं.

Cotton Pest | Agrowon
आणखी पाहा...