Humani  Agrowon
ॲग्रो विशेष

Infestation of Humani : शिरोळमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव

Humani Pest : शिरोळ तालुक्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : शिरोळ तालुक्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. उसाबरोबर अन्य पिकांना धोका निर्माण झाला असून मशागतीची कामे करून पेरणीसाठी पावसाकडे लक्ष लागले असताना ‘हुमणी’च्या प्रादुर्भावाचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसानंतर हुमणीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. उभी पिके वाचवण्याबरोबरच नव्याने पेरणी करण्याआधी हुमणीचे संकटावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यासाठी तालुका कृषी विभागामार्फत हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांनी शेतात सऱ्या सोडल्या असून शेत पेरणीसाठी तयार केले आहे.

अशातच शिरोळ तालुक्यात पेरणीच्या तोंडावर हुमणीचा प्रादुर्भाव होत आहे. दरवर्षी अवकाळी पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. प्रकाश सापळ्याचा वापर हा या किडीवर अतिशय रामबाण व प्रतिकात्मक उपाय आहे.

भुंगेरे एकत्रित पकडून नष्ट केल्यास जमिनीची अंडी पडणार नाहीत आणि हुमणी अळीचा जन्म होणार नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. कृषी विभागाकडून ठिकठिकाणी शेतकऱ्यांना हुमणी नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT