Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Bulletin: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज

राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा `येलो अलर्ट`

Anil Jadhao 

पुणेः राज्यात पावसाचा (Rain) जोर अद्यापही वाढलेला नाही. बहुतांशी जिल्ह्यांत ठिकठिकाणी हलका पाऊस (Normal Rain) होत आहे. हवामान विभागानं (IMD) उद्या सकाळपर्यंत राज्यात तूरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज (Yellow Alert) व्यक्त केलाय.

कोकणात (Kokan) काही भागांत पावसाचा जोर वाढलाय. पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर इतर भागांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्जत येथे मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. तर इतर मंडळांमध्ये पावसाची उघडीप होती. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील दोडामार्ग, कणकवली आणि सावंतवाडी या भागांत मध्यम सरी झाल्या. तर इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी होता.

मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, पुणे, सांगली, आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये हरक्या सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि कागल या मंडळांमध्ये मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. तर इतर ठिकाणी हलका पाऊस पडला.

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर आणि पैठण येथे मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. तर बीड, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत जोरदार सरी पडल्या. तर जालना जिल्ह्यातील मंठा येथे ४२ आणि अंबड येथे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील उदगीर, शिरूर, लातूर आणि औसा येथे मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथ्री आणि सेलू येते काही काळ मध्यम सरी झाल्या.

विदर्भातील अकोला, गडचिरोली, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील बहुतांशी मंडळात पावसानं हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. तर बुलडाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये पाऊस झाला.

तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. तर बहुतांश ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT