Groundnut Production Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Manganale: तेव्हा आम्हाला १२१ पोती भुईमूग व्हायचा...

मला आठवतंय, आम्ही त्यांनी उकरून काढलेल्या शेंगाचे २२ हिस्से करायचो. त्यातला दीड हिस्सा त्या बाईला जायचा. तो दीड हिस्सा म्हणजे पायलीभर शेंगा असत.

Maharudr Mangnale

Groundnut Production आज माझ्या शालेय आयुष्यातील एक आठवण जागी झाली. मधलं माळ या नावाने सात-आठ एकर जमीन होती. तांबूस माती. भुईमुगासाठी (Groundnut) खास. त्यावर्षी या मधल्या माळात भुईमुगाचं विक्रमी पिकं (Groundnut Production) आलं होतं. शेंगा काढणार्‍या बायकांना हिस्से करुन शेंगा मजुरी म्हणून देत.

मला आठवतंय, आम्ही त्यांनी उकरून काढलेल्या शेंगाचे २२ हिस्से करायचो. त्यातला दीड हिस्सा त्या बाईला जायचा. तो दीड हिस्सा म्हणजे पायलीभर शेंगा असत.

बायका खूष व्हायच्या. मी एका बाजुला, वडील दुसर्‍या बाजुला, दोघांच्या मध्ये भली मोठी चादर अंथरलेली. त्यावर शेंगांची वाटणी व्हायची.

चारला सुरू झालेलं काम, संध्याकाळी सहा- साडे सहापर्यंत चालायचं. मान-पाठ ताठून जायची पण त्यात आनंद होता. त्यावर्षी १०० पोते शेंगा झाल्या राशीला.

सरव्याला १४ पोते व तिसर्‍या वेळी ७ पोते अशा एकूण १२१ पोते शेंगा झाल्या. शिवाय उन्हाळाभर आम्ही रानावर भाजून निघालेल्या शेंगा खात होतो.

मी बी. ए. होईपर्यंत शेंगाचं उत्पादन टिकून होतं. नंतर ते कमी होतं गेलं. हळूहळू पिकं बदलत गेली. संकरित ज्वारी, सुर्यफुल आणि नंतर सोयाबीन आलं. भुईमुगासाठी पुरेसा आणि वेळेवर पाऊस होईना झाला.

भूईमूगाची पेर कमी होत-होत दोन-चार पायल्यांवर आली. पुढे शेंगांना रानडुकरांचा त्रास सूरू झाला. तरीही आईच्या आग्रहाखातर थोड्या शेंगा पेरायचो.

आजही शेंगाशिवाय माझा दिवस जात नाही. मला खायला शेंगा लागतातच. पण २०१० पासून भुईमूग पेरणं माझ्यापुरतं इतिहासजमा झालंय. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी माझी पत्नी सविताने बागेत थोड्या शेंगा लावल्या होत्या.

ती रास माझ्या हातात आली. एक कढई भरून शेंगा झाल्या. तब्बल १२१ पोती ते छोटी कढई, असा हा शेंगांचा प्रवास डोळ्यापुढून झर्रकन गेला...

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

limate Change Hits Marine Fisheries : हवामान बदलामुळे मासेमारीचे दिवस घटले; सीएमएफआरआयच्या संचालकांनी दिली माहिती

Water Planning: पंचक्रोशीनिहाय जलनियोजनाची गरज

Vegetable Processing: फ्रेश-कट उद्योगासाठी कच्च्या मालाचे प्रक्रिया तंत्र

Universities Adopt Villages: महाविद्यालयांनी गावे दत्तक घ्यावी : राज्यपाल वर्मा

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेत १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज माफ, ‘हेअर कट’ धोरणाचाही शेतकऱ्यांना लाभ

SCROLL FOR NEXT