Turkish President Erdogan Agrowon
ॲग्रो विशेष

India-Pakistan Relations: भारत-पाकिस्तानने चर्चेतून प्रश्‍न सोडवा

Turkish President Erdogan: तुर्कीएचे अध्यक्ष रेसिप तय्यप एर्दोगान पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा काश्मीर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी भारत-पाकिस्तानने चर्चेच्या माध्यमातून हा वाद सोडवावा आणि काश्मिरी जनतेच्या भावना प्राधान्याने विचारात घ्याव्यात, असे मत व्यक्त केले.

Team Agrowon

Islamabad News: पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेले तुर्कीएचे अध्यक्ष रेसिप तय्यप एर्दोगान यांनी काश्‍मीरमध्ये नाक खुपसले आहे. काश्‍मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवावा आणि यात काश्‍मीरच्या जनतेचा आशा आकांक्षांना स्थान द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांच्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेले अध्यक्ष एर्दोगान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर मत मांडले. दोन्ही नेत्यांनी चोवीस करार आणि एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेले निवेदन वाचले. यात त्यांनी द्वीपक्षीय संबंध आणखी सक्षम करण्याचा संकल्प केला.

निवेदनात त्यांनी अकारण काश्‍मीर मुद्दा उकरून काढला. ते म्हणाले, काश्‍मीरचा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून आणि संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार तसेच काश्मिरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन निकाली काढायला हवा. आमचा देश पूर्वीप्रमाणेच आजही काश्‍मीरच्या नागरिकांसमवेत उभा असल्याचे एर्दोगान म्हणाले.

पाकिस्तानशी संबंध अधिक दृढ करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीत व्यापार, जलस्रोत, कृषी, ऊर्जा, संस्कृती कुटुंब आणि सामाजिक सेवेबरोबरच विज्ञान, बॅकिंग, शिक्षण, संरक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रासंदर्भात एकूण चोवीस करार आणि एक सामजंस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, पाकिस्तान हे तुर्कीए नेत्यांचे दुसरे घर आहे.

त्यांनी पाच वर्षांनंतर पाकिस्तानात येणे उत्साहवर्धक आहे. तुर्किएचे अध्यक्ष आणि शिष्टमंडळाच्या भेटीने बंधुत्वाचे नाते जपले असून पाकिस्तानची जनता आनंदी असल्याचे शहाबाज शरीफ म्हणाले. यावेळी उभयंतांनी पंतप्रधान निवासस्थान परिसरात वृक्षारोपण केले.

त्यानंतर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी एर्दोगान यांची भेट घेतली.दरम्यान भारताने नेहमीच जम्मू काश्‍मीर, लडाख केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले आहे. तरीही पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती केल्या जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT