Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यासाठीचा विसर्ग वाढविला

Agriculture Irrigation : जायकवाडी धरणाच्या सांडव्याच्या द्वार क्रमांक १८ व १९ मधुन सोमवारी (ता. १९) ९ ते १० वाजेदरम्यान आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्याकरिता गोदावरी नदीपात्रात २०० क्युसेक विसर्ग वाढवून एकुण ७०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जायकवाडी धरणाच्या सांडव्याच्या द्वार क्रमांक १८ व १९ मधुन सोमवारी (ता. १९) ९ ते १० वाजेदरम्यान आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्याकरिता गोदावरी नदीपात्रात २०० क्युसेक विसर्ग वाढवून एकुण ७०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती जायकवाडी धरण नियंत्रण कक्षकडून देण्यात आली आहे.

धरण नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, जायकवाडी धरणाच्या सांडव्यामधुन गुरुवारी (ता. १५) सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान आपेगाव व हिरडपुरी बंधारा करिता गोदावरी नदीपात्रात ५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. हा विसर्ग नंतर ५०० क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला होता.

सोमवारी पुन्हा या विसर्गात २०० क्युसेकची भर टाकून तो विसर्ग ७०० क्युसेक करण्यात आला. यंदा जायकवाडी प्रकल्पावर पावसाची अवकृपाच राहिली. आताच्या घडीला जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा ३३ टक्क्यांवर आला. गतवर्षी आजच्या घडीला जायकवाडी प्रकल्पात ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून २५ जानेवारीला रब्बीसाठी दुसरे आवर्तन सुरू करण्यात आले. जवळपास २१०० क्युसेकने या कालव्यातून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या तीन जिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी पाणी सुरू केले. ते आता २२५० क्युसेकने सुरू आहे.

जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून बीड व नगर जिल्ह्यातील जवळपास ४१ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होण्यासाठी दुसरे आवर्तन १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले. २०० क्युसेकने सुरु करण्यात आलेला हा विसर्ग त्यानंतर ४०० क्युसेकने सुरु होता. टप्प्याटप्प्याने हा १००० क्युसेक पर्यंत नेला जाणार आहे. हा विसर्ग शुक्रवारी ५०० क्युसेकने सुरू होता. हे आवर्तन जवळपास १५ दिवस सुरू राहणार आहे. याआधी जायकवाडी प्रकल्पातून परळी थर्मल पावर स्टेशनसाठी जवळपास ४० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT