Farmer Loan Waive  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Target : पीककर्जाचे २४०० कोटींचे उद्दिष्ट

Agriculture Credit : खरीप तसेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना यंदा २ हजार ४०० कोटीचे पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : खरीप तसेच रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना यंदा २ हजार ४०० कोटीचे पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आराखड्याला मान्यता दिली असून, सर्वच बँकेच्या उद्दिष्टांत वाढ केली आहे.

पीककर्ज वाटपासाठी गेल्या वर्षी बँकांना दोन हजार २०० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करताना राष्ट्रीयीकृत बँकांचे अडवणुकीचे धोरण कायम असते. राष्ट्रीयीकृत बँका कासवगतीनेच पीककर्ज वाटप करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून नेहमीच केला जातो.

गेल्या वर्षी राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने जास्त पीककर्ज वाटप केले होते. त्यामुळे पीककर्ज वाटपाची राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी नेहमीप्रमाणे संथच असते. यंदा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०० कोटी रुपयांची वाढ केली आहे. यामुळे यंदा जिल्ह्याचे उद्दिष्ट दोन हजार ४०० कोटी झाले आहे. आगामी खरीप हंगामाची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी मीना यांनी सर्वच बँकांना उद्दिष्ट वाढवून दिले आहे. शेतकऱ्यांना पीककर्जाची अडचण होऊ नये, म्हणून बँकांना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिल्या आहेत.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून आतापासून तयारी केली जात आहे. यंदा २ हजार ४०० कोटींचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. खरिपासाठी २ हजार २०० तर रब्बीसाठी २०० कोटींचे उदिष्ट असणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, असा प्रशासनाचा प्रयत्न राहील.
- विकास मीना, जिल्हाधिकारी, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT