Pest Management Agrowon
ॲग्रो विशेष

Pest Management : एकात्मिक कीड व्यवस्थापनात जैविक निविष्ठांचा वापर वाढवा

Crop Management : यंदा कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिकामध्ये पिवळा मोझॅक रोगाचे प्रमाण कमी आढळून आले आहे. पण प्रभावी उपाययोजना आणि वेळेत काम होणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Solapur News : कमी खर्चातील आणि प्रभावी उपायांसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनात जैविक निविष्ठांचा वापर वाढवावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरच्या वतीने खरीप २०२३ कार्यक्रमांतर्गत नन्हेगाव (ता. अक्कलकोट) येथे सोयाबीन पिकातील एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आद्यरेखा प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. तांबडे बोलत होते. मल्लिनाथ आलुरे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. तांबडे म्हणाले, की यंदा कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिकामध्ये पिवळा मोझॅक रोगाचे प्रमाण कमी आढळून आले आहे. पण प्रभावी उपाययोजना आणि वेळेत काम होणे आवश्यक आहे. त्यासाठी एकात्मिक पद्धतीचे उपाय करताना जैविक उपाययोजना कधीही फायदेशीर ठरतात, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) समाधान जवळगे यांनी प्रात्यक्षिकांतर्गत दिलेल्या निविष्ठा व त्यामुळे किडींच्या प्रादुर्भावात कमी होणारे प्रमाण याविषयी माहिती दिली. प्रात्यक्षिकाचे लाभार्थी शांतप्पा आलुरे यांनी एकात्मिक कीड नियंत्रणाचे विविध घटक वापराचे महत्त्व सांगितले.

कामगंध सापळे, चिकट सापळे, जैविक कीटकनाशक नुमोरीय रिलाई, पक्षिथांबे इत्यादीचा वापर केल्याचे सांगितले. तसेच फवारण्याच्या संख्येमध्ये घट झाल्याचे सांगितले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रक्षेत्राला भेट देण्यात आली व पिकाची पाहणी करण्यात आली. विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT