Lemon Agrowon
ॲग्रो विशेष

Mumbai Lemon Rate : मुंबईत लिंबाच्या दरात वाढ

उन्हाचा चटका बसत असताना सर्वसामान्य नागरिकांचा या काहिलीपासून दिलासा मिळावा यासाठी लिंबू पाणी पिण्याचा कल असतो.

Team Agrowon

Navi MUmbai Lemon News : उष्णता म्हटले की, माणसाच्या अंगाची लाहीलाही होते. घशाला कोरड पडते, थंड पेय पिण्याची, गारव्याची इच्छा निर्माण होते. मग घशाची कोरड भागवण्यासाठी अनेक व्यक्ती लिंबूपाणी पिण्याला पसंती देतात.

मात्र, याच लिंबू पाण्याला (Lemon Water) अधिकचे पैसे मोजावी लागणार आहे. किरकोळ बाजारात एका लिंबासाठी पाच रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

उन्हाचा चटका बसत असताना सर्वसामान्य नागरिकांचा या काहिलीपासून दिलासा मिळावा यासाठी लिंबू पाणी पिण्याचा कल असतो. तीन ते चार दिवसांपासून उन्हाचा उकाडा वाढला आहे. अचानक वातावरणात बदल होत असल्याने नागरिक मेटाकुटीला येत आहे.

त्यामुळे घरगुती पेय लिंबू पाण्याला मागणी वाढली आहे. बाजारात मिळणाऱ्या लिंबाला अचानक मागणी वाढल्यामुळे त्याच्या किमतींमध्येही वाढ झालेली आहे.

एपीएमसी घाऊक बाजारामध्ये अहमदनगर, आंध्र प्रदेश अशा भागांमधून लिंबू येत आहे. घाऊक बाजारामध्ये ५० ते ८० रुपये शेकडा दराने लिंबू विकले जात होते. परंतु पाच ते सहा दिवसांपासून मागणी वाढल्यामुळे २०० ते ३०० रुपये प्रति शेकडा दराने लिंबाची विक्री होत आहे.

किरकोळ बाजारामध्ये एक लिंबू पाच रुपयांना मिळत आहे. सध्या लिंबाचे वाढते दर लक्षात घेता ग्राहकांना लिंबू पाणी पिण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

उन्हाळ्यातील चढे दर

उन्हाळा सुरू होताच लिंबाच्या दरामध्ये होणारी वाढ लक्षात घेता, एप्रिल, मे महिन्यांमध्ये लिंबाचे दर आवाक्याबाहेर असतील, अशी चर्चा ग्राहकांमध्ये चालू आहे.

उन्हाळा सुरू होण्याआधीच लिंबाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. उन्हाळा संपेपर्यंत लिंबाचे दर असेच चढे राहतील, अशी माहिती लिंबाच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.

लिंबू-पाण्याची मागणी

उन्हाच्या कडाक्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीराला थंडाव्याची गरज असते. त्यामुळे सर्वांना लिंबू पाणी पसंत पडते. लिंबू पाण्याने घशाचा कोरडेपणा कमी होतो आणि जास्त काळ एनर्जी टिकते. उन्हाच्या कडाक्यामुळे लिंबांना जास्त मागणी वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT