MGNREGA Agrowon
ॲग्रो विशेष

MGNREGA Wage: रोजगार हमीच्या मजुरीत वाढ! १ एप्रिलपासून नवे दर लागू

New Wage Rates 2025: १ एप्रिल २०२५ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (रोहयो) मजुरांच्या दैनंदिन मजुरीत १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील मजुरांना प्रतिदिन ३१२ रुपये मिळणार आहेत. मात्र, महागाईच्या तुलनेत ही वाढ अपुरी असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत महाराष्ट्रात १५ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता मजुरांना दर दिवसाला ३१२ रुपये मिळणार असून १ एप्रिल २०२५ पासून हे दरपत्रक लागू करण्यात आले आहे. देशाचा विचार केला तर हरियाना राज्यात मजुरांना सर्वाधिक चारशे रुपये दर दिवसाला मजुरी मिळेल. अरुणाचल प्रदेश आणि नागालॅंडमध्ये ‘रोहयो’च्या कामावर सर्वात कमी म्हणजे दर दिवसाला २४१ रुपये मजुरी निश्चित केली आहे.

मजुरांना रोजगार मिळावा आणि शेती विकासासाठी विविध योजनाही राबवता याव्यात यासाठी नगर- रोजगार हमी योजनेतून विविध कामे केली जात आहेत. यात प्रामुख्याने सिंचन विहिरी, फळबाग लागवड, शेततलाव, घरकुले, गायगोठा, शेळीपालन गोठा आदी कामे केली जात आहेत.

पाच एकरांपेक्षा कमी जमीनक्षेत्र असलेले तसेच जॉबकार्ड असलेले लाभार्थी नगर- रोजगार हमी योजनेच्या योजनेच्या तसेच कामाचा लाभ घेऊ शकतात. केंद्र सरकार या योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत वाढ करते. सध्या २९७ रुपये मजुरी मिळत असून १ एप्रिलपासून नव्या दरानुसार ३१२ रुपये मजुरी मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत व रोजगार हमी विभागाने या बाबत तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी कळवले असून एप्रिलपासून नव्या दरानुसार मस्टर भरुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार, हरियाना राज्यात १ एप्रिलपासून प्रति दिन चारशे रुपये, गोव्यात ३७८ रुपये, कर्नाटकात तीनशे सत्तर, केरळात ३६९ रुपये, बिहारमध्ये दोनशे पंचावन्न, आसामात दोनशे छप्पन्न, छत्तीसगडमध्ये २६१, जम्मू-काश्मीरमध्ये २७२, मध्य प्रदेशात २६१, मेघालयात २७२ रुपये मजुरी मिळेल. अरुणाचल प्रदेश आणि नागालॅंडमध्ये सर्वात कमी म्हणजे दर दिवसाला २४१ रुपये मजुरी मिळणार असल्याचे नमूद केले आहे.

महागाईच्या तुलनेत मजुरी कमीच

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर एप्रिलपासून ३१२ रुपये प्रति दिवसाला मजुरी मिळणार आहे. यंदा केंद्र सरकारने १५ रुपये वाढ केल्याने ३१२ रुपये झाले आहे. मात्र सध्याच्या महागाईचा विचार करता यंदा केलेली वाढ पुरेशी दिसत नाही. शेतीच्या कामासाठी मजुरांची असलेली मजुरी यापेक्षा अधिक आहे. सध्याची महागाईची परिस्थिती पाहता यंदाच्या वाढीसह रोजगार हमीच्या कामावरील मजुरी कमीच असल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT