Sugarcane Fertilizer Management 
ॲग्रो विशेष

Sugarcane Fertilizer Management : अशी वाढवा उसातील खतांची कार्यक्षमता

Sugarcane Fertilizer Use : ऊस हे तसं वर्षभराच पीक त्यामुळे उसाची अन्नद्रव्याची म्हणजेच खतांचीही गरज जास्त असते. उसात दिलेल्या खतांचा पुरेपुर वापर होण्यासाठी ठिबक सिंचनातून खत देण फायदेशीर ठरतं.

Team Agrowon

Sugarcane Fertigation : ऊस हे तसं वर्षभराच पीक त्यामुळे उसाची अन्नद्रव्याची म्हणजेच खतांचीही गरज जास्त असते. उसात दिलेल्या खतांचा पुरेपुर वापर होण्यासाठी ठिबक सिंचनातून खत देण फायदेशीर ठरतं.

दर एकरी ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत खत मात्रा द्यावी लागते. उसाला ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्यांचे योग्य आणि आवश्यक प्रमाण असणारी पाण्यात विरघळणारी खते मुळांशी योग्य त्या प्रमाणात देता येतात.C

ऊस हे तसं वर्षभराच पीक त्यामुळे उसाची अन्नद्रव्याची म्हणजेच खतांचीही गरज जास्त असते. उसात दिलेल्या खतांचा पुरेपुर वापर होण्यासाठी ठिबक सिंचनातून खत देण फायदेशीर ठरतं. ठिबकमधून उसाला खतं देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत. 

दर एकरी ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत खत मात्रा द्यावी लागते. उसाला ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्यांचे योग्य आणि आवश्यक प्रमाण असणारी पाण्यात विरघळणारी खते मुळांशी योग्य त्या प्रमाणात देता येतात. १२ महिन्यांचे ऊस पीक साधारणपणे एक टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १.१ किलो नत्र, ०.६ किलो स्फुरद आणि २.२५ किलो पालाश शोषून घेत.

म्हणजेच हेक्टरी दिडशे टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून दिडशे किलो नत्र, ९० किलो स्फुरद आणि जवळपास साडेतीशे किलो पर्यंत पालाश शोषून घेतल जात. म्हणून त्याप्रमाणातच उसाला खतांचा पुरवठा करणं गरजेचं असतं.  त्यासाठी दिलेल्या खतांचा जर पुरेपुर वापर होण्यासाठी उसाला ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत खत मात्रा द्यावी. सुरुवातीला पाहुयात ठिबक सिंचनातून द्यायची खतं निवडण्यासाठी आणि या खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी कोणती काळजी घ्यायची?   

खताच द्रावण तयार करण्यासाठी द्रावणामध्ये आवश्यक अन्नद्रव्याचं प्रमाण जास्तीत जास्त असावं. खतं पाण्यात लवकरात लवकर व पूर्णपणे विरघळणारी असावीत. खतं पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये. खतातील क्षारांमुळे ठिबकची गाळण यंत्रणा व ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडू नये.  

ठिबक संचातील कोणत्याही घटकावर गंज चढू नये किंवा ठिबकचा संच खराब होऊ नये. याशिवाय खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या मीठ व इतर क्षारांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये. उसाला जर एका वेळी एकापेक्षा जास्त खतं एकत्र करुन द्यायची असतील तर या खतांची कोणतीही अभिक्रिया होणार नाही अशीच खतं एकत्र करुन द्यावीत. या सगळ्या गोष्टी आमलात आणण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा जेणेकरुन नुकसान टाळल जाईल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vegetable Solar Dryer: सौर ड्रायरचे प्रकार अन् क्षमता

Indian Politics: गोंधळलेले सरकार अन विरोधकही...

Maize Production: मका : समतोल धोरण हवे

Purandar Airport: हरकती घेतल्यानंतरही विमानतळासाठी जमिनी का घेता?

Chakan Market: चाकण बाजारामध्ये काशीफळाच्या मागणीत वाढ

SCROLL FOR NEXT