Mahareshim Abhiyan  Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Farming : रेशीम शेतीसाठी नरेगातून मिळणार प्रोत्साहन

Mahareshim Abhiyan : रेशीम विभाग, कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्तपणे २० नोव्हेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत महारेशीम अभियान २०२४ राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nashik News : रेशीम विभाग, कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्तपणे २० नोव्हेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत महारेशीम अभियान २०२४ राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद नाशिक कृषी विभागामार्फत जिल्ह्यातून एकूण ४२३ शेतकऱ्यांची निवड रेशीम विभागामार्फत करण्यात आलो होती.

निवड झालेल्या व इच्छुक शेतकऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा जिल्हा परिषदेत झाली. विविध तालुक्यांतून प्रातिनिधिक स्वरूपात ४१ शेतकरी उपस्थित होते. कार्यशाळेत जिल्ह्यातून यापूर्वी रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा व अनुभवावर चर्चा झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी सर्व शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून मार्गदर्शन केले. नरेगातून तुतीलागवड व रेशीम शेतीस प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे सांगितले.

४०० शेतकऱ्यांची निवड होणार

नव्या शासन निर्णयानुसार एकूण १८१ शेतकऱ्यांची कृषी विभागामार्फत निवड करण्यात आली आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. गटस्तरावर शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती उद्योगाचे प्रशिक्षण होत असून, आजतागायत १३२२ शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेतला,

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांची निवड ही ग्रामसभेतून करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती कृषी अधिकारी यांना भेटावे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी दिली.

लाभार्थी निवडीचे निकष : कमीतकमी एक एकर व जास्तीत जास्त ५ एकर क्षेत्र आवश्यक. (अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य) यासह पाण्याची सोय आवश्यक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT