विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Yavatmal News : यवतमाळ ः नैराश्यातील शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण होत त्यांच्याद्वारेही व्यावसायिक शेतीपद्धतीला प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रयोगशील शेतकऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदनाची अनोखी परंपरा जपली जात आहे. पांढरकवडा सहकारी खरेदी- विक्री समितीचे अध्यक्ष जितेंद्रसिंग कोरमनगर व संस्थेच्या संचालकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यंदाही स्वातंत्र्य दिनाला शेतकऱ्यालाच हा सन्मान दिला जाणार आहे.
पांढरकवडा सोसायटीची स्थापना १९५९ रोजी शेतीला लागणाऱ्या निविष्ठांचा रास्त दरात शेतकऱ्यांना पुरवठा त्यासोबतच शेतात उत्पादित शेतीमालाची खरेदी आणि विक्री या उद्देशाने करण्यात आली. संस्थेचे आज ४२०० सभासद आहेत. २०१५ मध्ये जितेंद्रसिंग कोरमनगर यांनी अध्यक्षपदाची धुरा आपल्याकडे घेतली. आज निविष्ठा व्यवसायाची उलाढाल २ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सोयाबीन, तूर त्यासोबचत रब्बी हंगामात हरभरा बियाणे विक्री अनुदानावर केली जाते. ‘इफ्को’कडून १ लाख रुपये अनामत घेऊन संस्थेला ड्रोनचा पुरवठा करण्यात आला आहे. पाच वर्षांत २० हजार एकरावर ड्रोनद्वारे फवारणीचा उद्देश साधल्यास अनामत रक्कम परत केली जाणार आहे. या साऱ्या उपक्रमशीलतेची दखल घेत २०१६-१७ मध्ये अटल पणन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते अमरावती विभागातून दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने संस्थेला गौरविण्यात आले हे विशेष.
आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळची ओळख. मात्र अशाही स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी शेतीत प्रयोगशीलता जपत आर्थिक सक्षमता गाठली आहे. अशा शेतकऱ्यांपासून इतरांना प्रेरणा मिळावी याकरिता त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक तसेच स्वातंत्र्य दिनाला संस्थेद्वारा शेतकऱ्यांना हा मान दिला जातो.
- जितेंद्रसिंग गोरमनगर (कोंघारेकर),
अध्यक्ष, पांढरकवडा सहकारी खरेदी विक्री समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.