APMC Market Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Election : सिल्लोड-सोयगाव बाजार समिती निवडणुकीत राज्यातील सत्ताधारीच आमने-सामने

Sillod-Soygaon APMC Election Update : सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे १८ संचालक निवडीसाठी येत्या २८ जानेवारीला मतदान होत आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : राज्याच्या सत्ताकारणात सोबत असलेल्या शिवसेना व भारतीय जनता पार्टीतील स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध थोपटले आहेत. या दोन पक्षांच्या दोन पॅनेलमध्ये बाजार समिती निवडणुकीत थेट लढत होण्याची चिन्हे आहे.

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे १८ संचालक निवडीसाठी येत्या २८ जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वातील जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनल व भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या श्री सिद्धेश्वर-मुर्डेश्वर परिवर्तन सहकार विकास पॅनेल मैदानात आहे.

या निवडणुकीत मैदानात उतरलेल्या तिसऱ्या सहकार महर्षी कै. दादासाहेब पालोदकर शेतकरी संघर्ष सहकारी विकास पॅनलने सात उमेदवार मैदानात उतरविले असून एक अपक्ष उमेदवार ही आपले नशीब आजमावत आहे. महाविकास आघाडीचे तालुक्यातील अस्तित्व बघता या निवडणुकीत आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन हात दुर रहाणेच पसंत केले आहे.

बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व होते. मागील संचालक मंडळात ठगणराव भागवत पाटील यांचा अपवाद वगळता मंत्री सत्तारांच्या पॅनेलने एकहाती विजय मिळविला होता. जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात दबदबा पाहता त्यांच्यासाठी ही निवडणूक पुढील राजकीय नियोजनाचा भाग असेल.

भाजपने देखील संपूर्ण अठरा जागांवर उमेदवार उभे करून आव्हान उभे केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष असणार आहे. सिल्लोडच्या राजकारणात कायम एकमेकांच्या विरोधात गरळ ओकणारे दानवे व सत्तार यांच्यात मात्र राज्याच्या राजकारणात झालेल्या मनोमीलनामुळे छुपी मैत्री आता उघडपणे मिरविली जात आहे.

याविषयी दोघेही आता उघडपणे बोलतात. बाजार समितीवर मागील पंधरा वर्षांच्या सत्तेचा सारीपाट बघितल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप त्यानंतर कॉंग्रेस (मंत्रीअब्दुल सत्तार कॉंग्रेस पक्षात असतांना) आता शिवसेना शिंदे गट असे प्रभुत्व राहिले. आता मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी बाजार समितीच्या आखाड्यात कोणत्या पद्धतीने लढत देता याकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे.

सर्वाधिक ग्रामपंचायती तसेच सहकारी संस्था ताब्यात असल्याचा दावा दोन्ही पक्षांनी केल्यानंतर आता बाजार समितीच्या निवडणुकीत हे मतदान कोणाच्या पारड्यात जाणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. प्रचाराचा धुराळा जोमात असून २७ तारखेपर्यंत प्रचार सुरू राहील. २८ ला मतदानानंतर २९ जानेवारीला मतमोजणी अंतिम निकाल जाहीर होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT