Pomegranate Orchard Management Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Orchard : एका‍त्मिक अभियानात फळे, फुले, मसाला पिके लागवड होणार

Indian Agriculture : एका‍त्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Satara News : एका‍त्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला पिके लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळापिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन या बाबींचा समावेश आहे.

फुले लागवड कट फ्लॉवर्स अल्प भूधारक शेतकरी एक लाख रुपये प्रति हेक्टरी एकूण खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर, इतर शेतकरी-एक लाख रुपये प्रति हेक्टर-एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल पंचवीस हजार रुपये.

कंदवर्गीय फुले - अल्पभूधारक शेतकरी- एक लाख ५० हजार रुपये प्रति हेक्टर एकूण खर्चाच्या चाळीस ४० टक्के किंवा कमाल ६० हजार रुपये प्रति हेक्टर, इतर शेतकरी एक लाख ५० हजार रुपये प्रति हेक्टर - एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर.

सुटी फुले - अल्पभूधारक शेतकरी - चाळीस हजार रुपये एकूण खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल सोळा हजार रुपये प्रति हेक्टर, इतर शेतकरी-चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर-एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार रुपये प्रति हेक्टर.

मसाला पीक लागवड-बियावर्गीय व कंद वर्गीय मसाला पिके -३० हजार रुपये रुपये प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम १२ हजार रुपये प्रति हेक्टर. बहुवर्षीय मसाला पिके -५० हजार रुपये प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम २० हजार रुपये प्रति हेक्टर.

विदेश फळपीक लागवड-डॅगनफ्रूट- ४ लाख रुपये प्रति हेक्टर-एकूण खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल एक लाख ६० हजार रुपये प्रति हेक्टर, स्ट्रॉबेरी- २ लाख ८० हजार रुपये प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या चाळीस टक्के किंवा कमाल एक लाख १२ हजार रुपये प्रति हेक्टर, अवॅकॅडो- एक लाख रुपये एकूण खर्चाच्या चाळीस टक्के व कमाल ४० हजार रुपये प्रति हेक्टर.

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन - जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन ४० हजार रुपये प्रति हेक्टर, खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रति हेक्टर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT