Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात ३९ कोटी रुपयांची एफआरपी थकीत

Sugarcane Season : आगामी गाळप हंगाम तोंडावर आला, तरी सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांकडे मागील हंगामातील ३९.५३ कोटी रुपये एफआरपी अद्यापही थकीत आहे.

Team Agrowon

Solapur News : आगामी गाळप हंगाम तोंडावर आला, तरी सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांकडे मागील हंगामातील ३९.५३ कोटी रुपये एफआरपी अद्यापही थकीत आहे. दरम्यान, उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेली घट, ऊसतोडणी यंत्रणेचा अभाव आदी कारणांमुळे यंदाचा गाळप हंगाम जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात ३६ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. गेल्यावर्षी जिल्ह्यात उसाचे दोन लाख १० हजार ९५७ हेक्टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होते. शेजारच्या जिल्ह्यात त्यातील काही ऊस गाळपास गेला होता. उर्वरित क्षेत्रातून जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये एक कोटी ६८ लाख ४६ हजार ७५१ टन उसाचे गाळप झाले होते.

त्याचे चार हजार ६०० कोटी रुपये ऊसबिलाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मागील हंगामात जिल्ह्यात ९.४६ टक्के सरासरी साखर उताऱ्याने एक कोटी ५९ लाख ३२ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले होते. १५ जुलैअखेर जिल्ह्यातील कारखान्यांकडे ४९.८५ कोटी, ३१ जुलैअखेर ३७.६९ कोटी रुपये एफआरपी थकीत होती.

१५ ऑगस्टअखेर संपलेल्या पंधरवड्यात केवळ दोन कोटी रुपये थकीत एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली आहे. थकीत एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटनेने सोलापुरात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलने केली. पण कारखानदारांकडून अदयापही दाद मिळालेली नाही.

१५ ऑगस्टअखेर थकीत एफआरपी (कोटीत)

कारखाना थकीत

मातोश्री लक्ष्मी १४.५५

भीमा सहकारी ९.८०

जयहिंद शुगर ७.८७

विठ्ठल रिफाईंड ४.६५

सिद्धेश्वर सहकारी २.०२

आदिनाथ ०.६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT