Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : नगर जिल्ह्यात अजूनही ८६ गावांसह वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा

Water Issue : नगर जिल्ह्यात यंदा पावसाने लवकर सुरुवात केली खरी, पण अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळाच्या झळा अजूनही अनेक गावांत कायम आहेत.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा पावसाने लवकर सुरुवात केली खरी, पण अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळाच्या झळा अजूनही अनेक गावांत कायम आहेत. जिल्ह्यातील ८६ गावे, ४५८ वाड्या-वस्त्यावरील १ लाख ५८ हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.

नगर जिल्ह्यात यंदा अनेक भागाने दुष्काळाच्या झळा सोसलेल्या आहेत. गत वर्षी पुरेसा पाऊस नसल्याने शेती तर अडचणीत आलीच पण, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. टंचाईच्या झळा सोसत असलेल्या गावांना प्रशासनाने टॅंकरने पाणीपुरवठा केला. जिल्हाभरात टॅंकरची संख्या तीनशेच्या जवळपास गेली होती.

यंदा पावसाने लवकर सुरुवात केली. काही भागात चांगला पाऊस पडल्याने पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या गावांतील टॅंकर बंद झाले. मात्र अजूनही संगमनेर, कोपरगाव, नेवासा, राहाता नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई कायम आहे. ३० जूनपर्यंत टंचाईचा कालावधी असतो.

मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी टंचाई कायम असल्याने टॅंकरला मुदतवाढ दिलेली आहे. सध्या संगमनेर ताललुक्यात २८ गावे आणि ९४ वाड्यांना २१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अकोल्यात २ गावे आणि १० वाड्यांना ३ टॅंकरने, कोपरगावात ७ गावे ५७ वाड्यांना ७ टॅंकरने, नेवाशात २ गावे २ वाड्यांना २, राहाता तालुक्यात १ गाव व ८ वाड्यांना १ टॅंकरने, नगर तालुक्यात १० गावे ४७ वाड्यांना ११ टॅंकरने, पाथर्डी १२ गावे, ५७ वाड्यांना १२ टॅंकरने, शेवगावात ६ गावे, ३१ वाडयांना ६ टॅंकरने, तर श्रीगोंद्यात १ गावाला २ टॅंकरने असे ८६ गावे आणि ४५८ वाड्या-वस्त्यांना ८१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे टंचाई विभागातून सांगण्यात आले.

पाणीसाठे कोरडेच

नगर जिल्ह्यातील अकोले तालुका वगळता सध्या बहुतांश भागात पाऊस नाही. सुरुवातीला झालेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी पाणीस्त्रोत अजूनही कोरडे आहेत. अकोलेतील पाणलोट वगळता अन्य भागातील धरणे, पाणीसाठे कोरडेच असून शेतकरी, नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Management: संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे : मित्तल

Shaktipeeth Highway Protest: प्रस्तावित ‘शक्तिपीठ’साठी इंचभरही जमीन देऊ नका: राजू शेट्टी

Chhatrapati Sambhajinagar DPDC Meeting: ‘डीपीडीसी’ बैठकीत ९०९ कोटींचा आराखडा मंजूर

Vidarbha Farmer Issues: सिंचनाच्या अभावामुळेच शेतकरी आत्महत्या

Fake Fertilizers Seeds Issue: बोगस बियाणे, खत काळाबाजार प्रकरणांत थेट गुन्हे दाखल करा : विखे पाटील

SCROLL FOR NEXT