Monsoon  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : कोल्हापुरात धरणक्षेत्र वगळता पाऊस मंदावला

Rain Update : बुधवारी दुपारपर्यंत शहर व पूर्व भागांमध्ये एखादी हलकी सर वगळता पावसाचे प्रमाण कमी होते.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. ३) दुपारपर्यंत धरणक्षेत्र वगळता अन्य भागांत पावसाचे प्रमाण कमी होते. बुधवारी सकाळी सातच्या आकडेवारीनुसार जिल्‍ह्यातील चौदा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत शहर व पूर्व भागांमध्ये एखादी हलकी सर वगळता पावसाचे प्रमाण कमी होते.

राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली असे चौदा बंधारे पाण्याखाली आहेत.

बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्‍या चोवीस तासांत शाहूवाडीत सर्वाधिक ७४ मिमी पावसाची नोंद झाली. फाटकवाडी (ता. चंदगड) मध्यम प्रकल्प मंगळवारी (ता. २) सायंकाळी चारच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. सांडव्यावरून पाणी वाहू लागले. कोकण घाटमाथ्यावरील हा प्रकल्प दरवर्षी सर्वांत आधी भरतो.

धरण कार्यक्षेत्रात गेले तीन-चार दिवस चांगला पाऊस झाल्याने हा प्रकल्प भरण्यास मदत झाली. धरण क्षेत्रात एक जूनपासून आतापर्यंत १३२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सायंकाळी चारपर्यंत आठ तासांत २६ मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, गेले महिनाभर झालेल्या पावसाने संचय पातळी वाढली होती.

त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली. सध्या पाण्याची पातळी ७४२.३५ मीटर असून एकूण पाणीसाठा ४४.१७२ दशलक्ष घनमीटर आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे विद्युतगृह विसर्ग सुरू केला आहे. ९०० क्युसेक्सने विद्युतगृहासाठी पाणी सोडले जात आहे.

बुधवारी सकाळी आठपर्यंत झालेला जिल्ह्यातील पाऊस (मिमी मध्ये)

हातकणंगले ११.५, शिरोळ ३.३, पन्हाळा ६३.७, शाहुवाडी ७४.४, राधानगरी ३१.८, गगनबावडा ४८.४, करवीर १८.१, कागल २३.४, गडहिंग्लज २३.१, भुदरगड ३५.७, आजरा ३४.५, चंदगड ५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT