Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : गोंदिया जिल्ह्यात हमीभावाने २७ कोटींचे धान खरेदी

Paddy MSP Center : गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या हमीभाव केंद्रावर आता धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढीस लागली आहे.

Team Agrowon

Gondia News : गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या हमीभाव केंद्रावर आता धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढीस लागली आहे. आठ दिवसांच्या कालावधीत फेडरेशनच्या एकूण ८३ केंद्रांवरून १ लाख १७ हजार ५७ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आतापर्यंत जिल्ह्यात ८३ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ७१ हजार ४२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार १६४ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे.

१ लाख १७ हजार ०५७ क्‍विंटल इतक्‍या धानाची विक्री या शेतकऱ्यांद्वारे करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या या धानाची किंमत २६ कोटी ९२ लाख ३२ हजार असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. यावर्षी धानाला २३०० रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

धान मळणी प्रभावित

सध्या धान काढणी, मळणीची कामे सुरू आहे. परंतु अनेक भागांत या कामासाठी मजुरांच्या उपलब्धतेचा अडसर आहे. त्यामुळे हे काम प्रभावित झाले आहे. एकाचवेळी पीक काढणी आणि मळणीस आल याने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या हंगामात देखील ही परिस्थिती उद्भवली आहे.

प्रतिहेक्‍टर २५ हजारांचा बोनस

ई-पीक नोंदणी आणि हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून बोनस दिला जातो. यंदाच्या हंगामासाठी प्रतिहेक्‍टर २५ हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आली होती. त्यामुळे या आश्‍वासनाची पूर्तता सत्तेत येणाऱ्या महायुतीकडून कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT