Soybean Oil Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Oil Rate : बांगलादेशात सोयाबीन तेलाच्या दरात प्रतिलिटर आठ टक्क्यांची वाढ

Bangladesh Oil Market Update : राजकीय अस्थिरता असतानाच बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारकडून सोयाबीन खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर सरासरी आठ टका (बांगलादेशी चलन, भारतीय चलनात ५.६८ रुपये) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राजकीय अस्थिरता असतानाच बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारकडून सोयाबीन खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर सरासरी आठ टका (बांगलादेशी चलन, भारतीय चलनात ५.६८ रुपये) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात २० टक्‍के वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र आधीच आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये मात्र यामुळे असंतोष निर्माण झाला आहे.

शेख हसीन यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर सध्या काळजीवाहू पंतप्रधानांच्या माध्यमातून बांगलादेश सरकारचे कामकाज होत आहे. याच सरकारमधील वाणिज्य मंत्रालयाकडून सोयाबीन खाद्यतेलाच्या दरात वाढीची घोषणा करण्यात आली आहे. बाटलीबंद तेलासाठी आता प्रतिलिटर १७५ टका (१२४.३१ रुपये) दर आकारला जाईल.

त्याचवेळी सोयाबीनच्या खुल्या तेलासाठी प्रतिलिटर १५७ टका (१११.५३ रुपये) असा दर निश्‍चित करण्यात आला आहे. यापूर्वी बाटलीबंद तेलाचे दर प्रतिलिटर १६७ टका (११८.६२ रुपये) तर खुल्या तेलाचे दर प्रतिलिटर १४९ टका (१०५.८४ रुपये) होते. प्रतिलिटर तब्बल आठ टका याप्रमाणे तेलाच्या दरात वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

बांगलादेश खाद्यतेल संघाचे अध्यक्ष मुस्तफा हैदर यांनी वाणिज्य मंत्रालयातील बैठकीनंतर या संदर्भातील घोषणा केली. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात २० टक्‍के वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर बांगलादेशमध्ये खाद्यतेलाच्या दरात वाढीचा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीयस्तरावर खाद्यतेलाचे दर वाढतील याची कल्पना बांगलादेशी छोट्या व्यापाऱ्यांना आधीच होती.

त्यामुळे त्यांनी आधीच खाद्यतेलाचा पुरेसा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे दरवाढीनंतरही बाजारात खाद्यतेलाचा कोणताच तुटवडा भासणार नाही, असेही सांगण्यात आले. सध्या सोयाबीन खाद्यतेलाचा दर १२०० डॉलर प्रतिटन आहे.

खाद्यतेल दरवाढीचा फॉर्म्युला

आयात शुल्क, एलसी (आयात-निर्यातीकरिता आवश्‍यक लेटर ऑफ कन्सेंट), बॉटलिंग खर्च, कर तसेच १११० डॉलर प्रतिटन असे सर्व घटक विचारात घेत दर निश्‍चित केल्याचा दावा बांगलादेश खाद्यतेल संघाच्या वतीने करण्यात आला आहे. येत्या काळात याच फॉर्म्युल्यानुसार खाद्यतेलाचे दर कमी-जास्त केले जातील. त्याकरिता प्रत्येक महिन्याला खाद्यतेलाच्या दरावर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. खाद्यतेल संघाच्या या प्रस्तावाला बांगलादेशी वाणिज्य मंत्रालयाने देखील सहमती दर्शविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT