Amravati APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Amravati Apmc Election : अमरावतीत माजी संचालकांना पुन्हा बाजार समिती सत्तेचे वेध

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता.३) १६० च्या जवळपास नामांकन दाखल झाले.

Team Agrowon

Amravati News : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Amravati Agriculture Produce Market Committee) संचालक पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता.३) १६० च्या जवळपास नामांकन दाखल झाले.

आतापर्यंत एकूण २१२ नामांकन दाखल झाले असून छाननी व अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर २० एप्रिलला रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.

दरम्यान गतवेळच्या संचालक मंडळातील सुनील वऱ्हाडे वगळता इतर सर्वांनीच नामांकन दाखल केले आहेत.

तर गतवेळी निवडून न आलेल्या उमेदवारांनी पुन्हा भाग्य अजमाविण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याने अर्जांची संख्या वाढली आहे.

अमरावती बाजार समितीच्या १८ सदस्यीय संचालक मंडळासाठी येत्या २८ एप्रिलला निवडणूक होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल १६० जणांनी अर्ज दाखल केल्याने आतापर्यंत एकूण २१२ जणांचे नामांकन झाले आहे.

नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये मावळलेल्या संचालक मंडळातील सुनील वऱ्हाडे वगळता उर्वरित सर्वांनीच मैदानात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी सभापती अशोक दहीकर, माजी उपसभापती नाना नागमोते, माजी संचालक प्रफुल्ल राऊत, उषा वनवेस, प्रांजली भालेराव, मिलींद तायडे, विकास इंगोले, किरण महल्ले, किशोर चांगोले, उमेश घुरडे, रंगराव बिचुकले, प्रवीण भुगूल, प्रकाश काळबांडे, शाम देशमुख यांच्यासह व्यापारी अडते मतदार संघातील सतीश अटल, प्रमोद इंगोले व हमाल मापारी मतदार संघाचे माजी संचालक बंडू वानखडे यांचा समावेश आहे.

व्यापारी अडते मतदार संघात राजेश पाटील, रणजित खाडे, अनिल जेठाणी, परमानंद अग्रवाल तर हमाल मापारी मतदारसंघातून प्रवीण साठे, शिवाजी पावडे, प्रभाकर मेश्राम, रघुनाथ पवार यांनी अर्ज दाखल केले आहे.

आज अर्जांची छाननी आज (ता.५) अर्जांची छाननी करण्यात येणार असून वैध नामनिर्देशन पत्राची यादी उद्या (ता.६) जाहीर होणार आहे. २० एप्रिलपर्यंत इच्छुकांना अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर रिंगणातील उमेदवार स्पष्ट होणार आहेत.

२१ एप्रिलला उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. २८ एप्रिलला मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी २९ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT