Egg Market Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Egg Market : मागणी वाढल्याने राज्यात अंड्यांच्या दरात सुधारणा

Egg Rate : थंडीत झालेली वाढ त्यासोबतच पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आल्याने राज्यात अंड्यांना मागणी वाढली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Egg Market Rate : अमरावती ः थंडीत झालेली वाढ त्यासोबतच पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आल्याने राज्यात अंड्यांना मागणी वाढली आहे. परिणामी दरातही सुधारणा झाल्याची माहिती पोल्ट्री व्यवसायिकांनी दिली.

अंड्यांना साडेपाच रुपये प्रतिनग असा दर मिळत आहे. दरम्यान शालेय पोषण आहाराकरिता पुरवठा होणाऱ्या अंड्यांची खरेदी स्थानिक पोल्ट्री व्यवसायिकांकडूनच करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

राज्यात रोज सुमारे २ कोटी अंड्यांची विक्री होते. महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायिकांकडून ही गरज पूर्ण होत नसल्याने देशाच्या इतर भागातून राज्यात अंडी येतात. त्यामध्ये तमिळनाडू, आंध प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा मुख्यत्वे समावेश आहे. विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसाय विस्तारला असून या एकट्या जिल्ह्याचे रोजचे अंडी उत्पादन दहा लाखांच्या घरात आहे.

विदर्भाचा एकंदरीत विचार करता ११ जिल्ह्यांचे अंडी उत्पादन २० लाखांच्या घरात असल्याची माहिती मातोश्री पोल्ट्री फार्मचे संचालक रवींद्र मेटकर यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून अंड्यांचे दर मागणीअभावी दबावात होते.

साडेतीन ते चार रुपये असा दर अंड्यांना मिळत होता. उत्पादकता खर्च साडेचार रुपये असल्याने उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याने नुकसान सोसावे लागले. परिणामी अनेक लेअर पोल्ट्री व्यवसायिकांनी नवीन बॅचच टाकली नाही.

त्यामुळे राज्याचे अंडी उत्पादन प्रभावीत झाले. त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. सध्या अंड्याला प्रतिनग साडेपाच रुपये दर मिळत आहे. अंड्यांचा किरकोळ विक्री दर साडेसहा ते सात रुपये झाला आहे. परिणामी पोल्ट्री व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

शालेय पोषण आहार योजनेत वर्ग एक ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अंडी दिली जात आहेत. त्यामुळे राज्यात मागणी वाढली असून थंडीमुळेदेखील दरवर्षी मागणीत वाढ होते. या दोन्हीच्या परिणामी अंडी दर वधारले आहेत.

ही स्थिती कायम राहायची असेल तर शासनाने पोषण आहारातील अंड्यांच्या खरेदीकरिता स्थानिक व्यवसायिकांचाच विचार करावा.
- रवींद्र मेटकर, संचालक, मातोश्री पोल्ट्री फार्म, अंजनगावबारी, अमरावती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT