Egg Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Egg Rate : अंडी दरात सुधारणा; शेकडा ४४० रुपयांवर

Egg Market : दरातील कृत्रिम तेजी-मंदीमुळे लेअर पोल्ट्रीधारकांचे नुकसान

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : हिंदी भाषिकांच्या श्रावणाला सुरुवात होताच अंडी दरात घसरण नोंदविण्यात आली. करीमनगर (तेलंगणा) बाजारात अंड्याचे दर ४०५ रुपये शेकड्यावर आल्यानंतर त्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी कमी दरात अंडी खरेदी केली.

कोल्डस्टोरेजमध्ये याची साठवणूक करून आता तीच अंडी जादा दराने विक्री करण्यात येणार आहेत. या व्यवहारात मात्र लेअर पोल्ट्रीधारकांना नुकसान सोसावे लागत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान अंडी दरात सुधारणा होऊन सोमवारी (ता. २९) दर ४४० रुपये शेकडावर पोहोचले.

महाराष्ट्राची रोजची अंडी मागणी ही एक कोटी नग आहे. राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या माध्यमातून त्याची पूर्तता शक्‍य होत नाही. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतूनही अंडी महाराष्ट्रात आयात होतात.

तेथील राज्य सरकारने पोल्ट्रीसाठी काही सवलती दिल्या आहेत. त्यामुळे त्यांना कमी दरात अंडी विकणे शक्‍य होते. महाराष्ट्रात मात्र अशा कोणत्याच सवलती पोल्ट्री क्षेत्रासाठी नाहीत, परिणामी या भागात अंडी उत्पादकता खर्च प्रतिनग साडेचार रुपये आहे.

सध्या हिंदी भाषिकांचा श्रावण सुरू झाल्यानंतर अंडी मागणीत घट नोंदविली गेली. परिणामी ४०५ ते ४१० रुपये शेकडापर्यंत दर घसरले. त्यामुळे उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य होत नसल्याची स्थिती आहे.

तेलंगणातील करीमनगर भागात अंडी दर ४०५ रुपयांवर आले. ही संधी साधत व्यापाऱ्यांनी नफेखोरीच्या उद्देशातून त्याची खरेदी केली. कमी दरात खरेदी केलेल्या अंड्यांची साठवणूक करून दर वाढताच त्याची विक्री केली जाणार आहे.

त्याच प्रयत्नांअंतर्गत आता दर ४०५ ते ४१० रुपयांवरून वाढत सोमवारी (ता. २९) ते ४४० रुपयांवर पोहोचले. राज्यातील काही लेअर पोल्ट्री व्यावसायिकांनी यापूर्वीचे सौदे ४२० रुपयांनी केले आहेत.

त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. विशेष म्हणजे पंधरवड्यापूर्वी अंडी दर सध्याच्या ४०० रुपयांवरून ५२० रुपयांवर गेला होता. आता दरातील घसरणीमुळे लेअर पोल्ट्री व्यावसायिकानी चिंता वाढली आहे.

करीमनगर (तेलंगणा) भागात अंडी दर शेकडा ४०० ते ४०५ रुपयांवर आले होते. दर कोसळताच मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्याची साठवणूक कोल्डस्टोरेजमध्ये केली जाते. अंड्यांची टिकवण क्षमता अधिक आहे.

त्यानंतर तेजी आणत ही कमी दरात खरेदी केलेली अंडी विकून नफा कमविण्यावर व्यापारी भर देतात. त्यामुळे लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागते. अशा प्रकारांना पायबंद बसावा, याकरिता शासन पातळीवरून यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

- रवींद्र मेटकर, पोल्ट्री व्यावसायिक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT