Banana Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Rate : खानदेशात केळीदरात सुधारणा

Banana Market : दर १००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल

Team Agrowon

Khandesh Banana Market: खानदेशात केळी दरात मागील चार-पाच दिवसांत प्रतिक्विंटल सुमारे १०० रुपयांची सुधारणा झाली आहे. सध्या दर २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. किमान दरही १९०० रुपये प्रतिक्विंटल असून, दर्जानुसार दर दिले जात असल्याची माहिती केळी उत्पादक व व्यापाऱ्यांनी दिली.

केळीची आवक सध्या कमीच आहे. मागील महिनाभरात आवकेत वाढ झालेली नसून मागील १० ते १२ दिवसांत आवकेत आणखी पाच ट्रकने (एक ट्रक १६ टन क्षमता) घट झाली आहे. सध्या प्रतिदिन ३८ ट्रक केळीची आवक होत आहे. थंड, विषम वातावरणामुळे केळी पक्व होण्याची क्रिया मंद झाली आहे. यामुळे केळी काढणी रखडत सुरू आहे.

कमी दर्जाच्या केळीचे दर १०००, १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. काही खरेदीदार कमी व चांगल्या दर्जाच्या केळीची खरेदी सरसकट १६२५ रुपये प्रतिक्विंटल या दरात करीत आहेत. दर्जेदार केळीला उत्तरेकडे उठाव असून, काश्मीर, दिल्ली येथे बॉक्समध्ये पॅकिंग करून केळीची पाठवणूक केली जात आहे.

बॉक्समध्ये पॅकिंगच्या केळीस प्रतिक्विंटल २१०० रुपये दर मिळत आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात केळीची आवक नाही. परिणामी बाजारात पुरवठा कमी आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर भागात केळीची आवक आहे. परंतु ही आवकदेखील कमी आहे.

राज्यात केळीला नवी मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर या भागांतूनही मागणी आहे. तसेच कमी दर्जाच्या केळीची पाठवणू छत्तीसगड, राजस्थान या भागांत केली जात असल्याची माहिती उत्पादक व व्यापाऱ्यांनी दिली.

दाक्षिणेतील आवकही कमी
उत्तरेकडील बाजारात दाक्षिणात्य भागातून केळीची आवक कमीच आहे. मध्यंतरी आंध्र प्रदेशातून आवक सुरू झाली होती. परंतु ही आवकही कमी आहे. यामुळे खानदेशातून रोज १५ ते २० ट्रक केळीची मागणी उत्तरेकडे आहे. दिल्ली, पंजाबमधील मॉल्समध्ये खानदेशातून केळीची अधिकची पाठवणूक होत असल्याची माहिती देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT