Grape Production Agrowon
ॲग्रो विशेष

New Grape Varieties : निर्यातक्षम उत्पादनासाठी नवे द्राक्ष वाण आयात करा

Exportable grapes : जागतिक बाजारपेठेत मागणी असलेले पेटेंटेड तसेच नॉन पेटेंटेड द्राक्षवाण आयात केल्यास कमी उत्पादन खर्चात निर्यातक्षम द्राक्षे तयार होतील.

Team Agrowon

Nashik Grape News : जागतिक बाजारपेठेत मागणी असलेले पेटेंटेड तसेच नॉन पेटेंटेड द्राक्षवाण आयात केल्यास कमी उत्पादन खर्चात निर्यातक्षम द्राक्षे तयार होतील. द्राक्ष उत्पादकांना निर्यातीबरोबरच भारतीय बाजारपेठेत द्राक्षांना चांगला भाव मिळेल.

त्यामुळे अशा द्राक्ष वाणांची आयात करणे आवश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या शिष्टमंडळाने भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांच्याकडे केली.

संघाच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने उत्तर भारतात नुकताच अभ्यास दौरा केला. दरम्यान, संघाच्या संचालक मंडळाने बुधवारी (ता. २१) नवी दिल्ली येथे डॉ. पाठक यांची भेट घेतली. द्राक्ष विपणन आणि निर्यात यासंबंधी येणाऱ्या विविध समस्यांविषयी चर्चा करून त्यांना निवेदन दिले.

संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, कोशाध्यक्ष सुनील पवार, मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, चारही विभागांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.

निवेदनानुसार, राज्यात द्राक्ष शेतीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. पूर्वी बियांसहित द्राक्ष उत्पादन घेतले जायचे; मात्र अलीकडे त्यात सुधारणा होऊन बियारहित द्राक्ष उत्पादन घेतले जाते. काही शेतकऱ्यांनी निवड पद्धतीने वाण विकसित केले आहे. यातून पांढरी, काळी, लांब द्राक्षांचे वाण विकसित होऊन अनेक स्थानिक वाणांची लागवड झाली आहे.

मात्र वाढलेला खर्च मोठी समस्या आहे. जागतिक बाजारपेठेत निर्यातक्षम मालाला मागणी आहे. मात्र त्यास मर्यादा आहेत. त्यामुळे नवीन वाणांचे महत्त्व वाढले आहे. पेटेंटेड वाण लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

प्रमुख मागण्या अशा...

- राज्यात द्राक्ष लागवड सुमारे ४.५० लाख एकरांपर्यंत विस्तारली आहे. पीकपाणी नोंदणी करून अचूक क्षेत्र निश्‍चित व्हावे.

- निर्यातक्षम बागांसह स्थानिक बाजारात विक्रीसाठी असेलल्या द्राक्ष उत्पादनाची नोंद घ्यावी.

- कृषी निविष्ठांमधील भेसळ, त्यातील काळाबाजार, कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने विक्री आदी प्रकार थांबवावेत.

- परदेशात द्राक्ष शेतीसाठी असलेल्या स्वयंचलित क्रॉप कव्हर मॉडेलचा अभ्यास करून ते उपलब्ध व्हावे.

- भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या देशभरातील संलग्न संशोधन केंद्रावर द्राक्ष महोत्सव भरवावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT