Deola APMC Agriculture
ॲग्रो विशेष

Deola APMC : शेतीमालाचे रोख पैसे निर्णयाची अंमलबजावणी

Agriculture Market : शेतकऱ्यांना रोख पेमेंट वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. देवळा बाजार समिती अस्तित्वात आल्यापासून अमावस्येला मार्केट बंद ठेवण्याची रूढी होती.

Team Agrowon

Nashik News : शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख पैसे मिळावेत यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने १ जानेवारीपासून बाजार समिती कर्मचाऱ्यांमार्फत कार्यालयातच रोख रक्कम वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून त्याची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याने शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

शेतकऱ्यांना रोख पेमेंट वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. देवळा बाजार समिती अस्तित्वात आल्यापासून अमावस्येला मार्केट बंद ठेवण्याची रूढी होती.यामुळे बाजार समिती बरोबरच शेतकऱ्यांचेही नुकसान होत असे. अमावस्येच्या दिवशी मार्केट बंद ठेवण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय बाजार समितीचे तत्कालीन सभापती केदा आहेर यांनी घेतला. आता अमावास्येलाही मार्केट चालू असते.

यापूर्वी बाजार समिती आवारात कांदा ट्रॅक्टर लिलावासाठी न आणता त्या ठिकाणी दोरी बांधून नंबर लावत जागा अडवणाऱ्या दोरी बहाद्दर शेतकऱ्यांना चाप लावण्यात आला आहे. कांदा लिलावासाठी येणाऱ्या ट्रॅक्टरना टोकन पद्धत सुरू करून योग्य क्रमाने लिलाव होतात.

शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे २४ तासांत देण्याच्या सुचना बाजार समिती प्रशासन कायमच करत असले तरी काही तक्रारी या असायच्याच. यातून मार्ग काढण्यासाठी बाजार समिती संचालक मंडळ व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक सभापती योगेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

त्यात, १ जानेवारीपासून व्यापाऱ्यांनी लिलाव झाल्यानंतर खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे बाजार समितीत जमा करावे. बाजार समितीत शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा विक्रिच्या पैशांचे वेळेवर वाटप सुरू झाले.

स्वतंत्र कक्ष कार्यान्वित

सध्या बाजार समितीत सक्रिय कांदा व्यापारी २५, भुसार व्यापारी १० आहेत. देवळा बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या निंबोळा येथील खरेदी-विक्री केंद्रासाठी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कांदा लिलावाची वेळ सकाळी साडेनऊ व दुपारी साडेचार असून, चार कर्मचारी लिलाव प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. लिलाव झाल्यानंतर ट्रॅक्टर खाली करतांना कांद्यात निघणारा वांधा, शेतकऱ्यांचे पेमेंट आदी विविध समस्या सोडवण्यासाठी कांदा नियोजक सहाय्यक सचिव डी. व्ही. सूर्यवंशी यांची स्वतंत्र नेमणूक करण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT