Sanjay Bansode Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात येणार : पालकमंत्री बनसोडे

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी पीकनुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.

Team Agrowon

Parbhani News : शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी पीकनुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.

परभणी जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील रब्बी ज्वारी, कापूस, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देण्यात यावा. अवकाळी पावसामुळे बाधित शेतीपिकांचे येत्या दोन दिवसांत वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्यात यावेत.

पीकविमाधारक शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे तत्काळ माहिती सादर करावी. जिल्ह्यातील कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी हा नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी.

त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत असून, बुधवारी (ता. २९) पूर्णा तालुक्यात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT