Urea Bag Sized  Agrowon
ॲग्रो विशेष

Subsidize Urea : साताऱ्यात युरियाची ७६ पोती जप्त

Urea Bag Seized : या कारवाईत युरिया खताची एकूण ७६ पोती सुमारे साडेतीन टन युरिया खताची पोती जप्त करण्यात आली.

Team Agrowon

Satara News : शेती वापराचा अनुदानित निमकोटेड युरिया औद्योगिक कारणासाठी गैरमार्गाने वापर केल्याने सातारा एमआयडीसी येथील सातारा कॅटल फीड प्रायव्हेट लिमिटेड व अशोका कॅटल ॲण्ड पोल्ट्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत युरिया खताची एकूण ७६ पोती सुमारे साडेतीन टन युरिया खताची पोती जप्त करण्यात आली.

रसायने व खते मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चेतराम मीना, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सत्यजित शिंदे यांनी कॅटल फीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीची तपासणी केली असता गोदामात आरसीएफ व इफ्को कंपनीच्या युरिया खताची ५३ पोती व सुतळी बारदानामधील २३ पोत्यांमध्ये शेती वापराचा नीम कोटेड युरिया खत पशुखाद्य तयार करण्याच्या औद्योगिक कारणास्तव वापर केला जात असल्याचे आढळले.

या प्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अनुदानित शेती उपयोगी युरियाचा औद्योगिक कारणास्तव गैरवापर करून फसवणूक केल्याने पोलिसांनी सातारा कॅटल फीड कंपनीचे संचालक मोहम्मद अली मोहम्मद हनीफ बागवान, इम्रान कासीम मोहम्मद हनीफ बागवान, कंपनी सुपरवायझर सलीम पठाण व अशोका कॅटल ॲण्ड पोल्ट्री फीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ए फॉर इंडस्ट्रिअल एरिया बेला जिल्हा दरभंगा बिहार या कंपनीचे रिजनल मॅनेजर महेश कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सातारा एमआयडीसीतील कंपनीत शेती वापराचा अनुदानित निमकोटेड युरिया औद्योगिक कारणासाठी गैरमार्गाने वापर केल्याच्या प्रकारात गुन्हा दाखल केला आहे. या काळाबाजारात आणखी शोध मोहीम सुरू केली असून, शासन व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे.
- गजानन ननावरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT