Krishi Seva Kendra  Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Seva Kendra : कृषी सेवा केंद्राच्या उत्पन्नात दहा टक्‍के घट

Illegal Seed Sale : कृषी विभाग आणि पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे यंदा अनधिकृत बियाणेच नाही तर त्याच्या जोडीला बेकायदेशीर कीटकनाशक आणि खतांची विक्री तस्करांकडून होत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : कृषी विभाग आणि पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे यंदा अनधिकृत बियाणेच नाही तर त्याच्या जोडीला बेकायदेशीर कीटकनाशक आणि खतांची विक्री तस्करांकडून होत आहे. त्याचा थेट परिणाम व्यवसायावर झाला असून हंगामाच्या सुरुवातीलाच उत्पन्नात दहा टक्‍के घट झाल्याचा खळबजनक दावा नागपूर डिस्ट्रीक ॲग्रो डीलर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

तणाला प्रतिकारक (एचटीबीटी) वाण असल्याचा कांगावा करीत दरवर्षी काही एजंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व बोगस बियाण्यांचा पुरवठा होतो. हे बियाणे न उगवल्यास शेतकऱ्यांचा हंगाम वाया जातो; मात्र बियाणेच बेकायदा असल्याने तक्रार करून भरपाई देखील मागता येत नाही.

यातूनच नैराश्‍य वाढत शेतकरी आत्महत्या होतात, असा दावा ॲग्रो डीलर्स असोसिएशनचा आहे. यंदा मात्र बेकायदेशीर बियाण्यांच्या जोडीला आंध्र प्रदेश आणि गुजरात पॅटर्नच्या बोगस तीन कीटकनाशकांचा अनधिकृत सेट याच बियाण्यांसोबत दिला जात आहे.

यामध्ये बोगस तणनाशक व कीटकनाशकांचा समावेश असून, ते २०० लिटर ड्रममध्ये तयार करुन नामवंत कंपन्यांच्या बॉटलमध्ये भरण्यात येते. अनधिकृत बियाणे पुरवठादारांच्या माध्यमातूनच हे गैरकायदेशीर काम होत आहे.

इतकेच नाही तर ८५० रुपयांत डीएपी आणि १०ः२६ः२६ या सारख्या खतांची देखील बुकिंग करून त्याचा पुरवठा थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत केला जात आहे. बोगस बियाणे, कीटकनाशक आणि खतांची अशाप्रकारे तस्करी होत असल्याने त्याचा परिणाम कायदेशीर परवाना असलेल्या सेवा केंद्रधारकांच्या व्यवसायावर झाला आहे.

कायद्याची कोणतीच भीती नाही

बेकायदेशीर निविष्ठा तयार करून त्याचे नामवंत कंपन्यांच्या ब्रॅण्डने पॅकिंग केले जाते. अशा काही तस्करांनी कृषी सेवा केंद्रधारकांशी संपर्क साधत त्यांना स्वस्तात अशा निविष्ठा देण्यासाठी संपर्क साधला होता. त्यावरूनच त्यांना कायद्याची कोणतीच भीती नसल्याचे सिद्ध होते. कृषी विभाग एक-दोन पाकिट जप्तीची कारवाई करतो तर पोलिस विभाग गावस्तरावरील कारवाईच्या पुढे जात नाही, अशी खंत नागपूर ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

अनधिकृत बियाण्यांविरोधातील १९ कारवायांमध्ये ७९ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. परंतु बियाण्यांसोबत खते कीटकनाशक व इतर निविष्ठांची विक्री होत असल्याचा दावा सपशेल खोटा वाटतो. शेतकऱ्यांच्या स्तरावरच अशाप्रकरणांमध्ये तक्रारी करण्यात येतात.
- उमेश घाटगे, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूरं

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supreme Court On MSP : महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांची जनहित याचिका ; हमीभावबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले निर्देश

Maharashtra Heatwave: मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट; कोकणात तीन दिवस उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'च्या नावाखाली फसवणूक, आदिती तटकरेंनी घेतली गंभीर दखल, दिला महत्त्वाचा सल्ला

Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेची कामे ठप्प

Orange Farming: उन्हाळ्यात संत्रा बागेत घ्यावयाची काळजी

SCROLL FOR NEXT