Illegal Cotton Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

HTBT Cotton : नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांतील कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये साधारणतः सव्वानऊ लाख हेक्टर क्षेत्रावर बीटी कापूस बियाण्याची लागवड केली जाते.

Team Agrowon

Nashik News : भारतात बंदी असलेले जनुकीय परावर्तित कापूस वाणांचे बियाणे राज्यात विक्री व लागवड होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने या अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याला आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम, यासह धाडसत्र सुरू केले आहे.

याचाच एक भाग म्हणून नाशिक विभागात धुळे जिल्ह्यात दोन व नंदुरबार जिल्ह्यात दोन अशा एकूण चार पोलिस कारवाई करण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमध्ये एकूण २१५१ एचटीबीटी कापूस बियाण्याची पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत रुपये ३१ लाख २३ हजार इतकी आहे.

नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांतील कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये साधारणतः सव्वानऊ लाख हेक्टर क्षेत्रावर बीटी कापूस बियाण्याची लागवड केली जाते. त्यासाठी ४५ लाख पाकिटांची आवश्यकता असते. येत्या खरीप हंगामात कापूस बियाणे हे शेतकऱ्यांना विक्रीसाठी १६ मेपासून खुले केले आहे.

त्यामध्ये बोंड अळीला प्रतिबंध करण्यासाठी १ जूननंतर शेतकऱ्यांनी कापूस लागवड करण्याचे आवाहन केलेले आहे. मात्र राज्यात मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा या शेजारील राज्यांमधून एचटीबीटी या अवैध कापूस बियाण्याची वाहतूक व विक्री छुप्या मार्गाने केले जात आहे.

धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांना गुजरात राज्याची सीमा लागून असल्याने या मार्गाने या एचटीबीटी कापूस बियाण्याची विक्री व वाहतूक शेतकऱ्यांपर्यंत केली जात आहे. या सर्व वाहतुकीवर व विक्रीवर कृषी विभागाची नजर असल्याची माहिती गुणनियंत्रण विभागाने दिली आहे.

यांच्यावर झाली कारवाई

नंदुरबार जिल्ह्यातील खापर (ता. अक्कलकुवा) येथे इच्छापूर्ती ॲग्रो एजन्सी व गुजरात राज्यातील संशयितांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच लोहगाव (ता. सिंदखेडा) येथील संत कृपा कृषी सेवा केंद्र व धुळे शहरातील प्रवासी ट्रॅव्हल बसने पार्सलमधून आणलेले एचटीबीटी बियाण्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे.

बेकायदेशीररीत्या एचटीबीटी कापूस बियाण्याचे दुष्परिणाम व धोके ओळखून हे बियाणे विकत घेऊन लागवड करून आपले व जमिनीचे आरोग्य धोक्यात घालू नये. तसेच आर्थिक नुकसान करून घेऊ नये. मान्यताप्राप्त असलेले बीजी टू व इतर कापसाचे बियाणे अधिकृत बीलानेच खरेदी करावे.
-मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT