Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Fertilizer Stock : अवैध खतसाठाप्रकरणी पाथरी पोलिसांत गुन्हा

Fake Fertilizer Sale : पोहे टाकळी (ता. पाथरी) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोदामात तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या संशयास्पद खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अवैध खतसाठा बाळगलेला आढळून आला.

Team Agrowon

Parbhani News : पोहे टाकळी (ता. पाथरी) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोदामात तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या संशयास्पद खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अवैध खतसाठा बाळगलेला आढळून आला.

या प्रकरणी गोविंद पवार (रा. आनंदनगर, ता. पाथरी) याच्या विरुद्ध पाथरीचे तालुका कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक गोविंद कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. १७) गुन्हा नोंद झाला आहे.

पाथरी ते मानवत रस्त्यावरील पोहे टाकळी (ता. पाथरी) शिवारातील गोदामातून संशयास्पद अनाधिकृत खतसाठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने रविवारी (ता. १५) दुपारी गोदामाला सिल ठोकले.

सोमवारी (ता.१६) सकाळी खत निरीक्षक तथा तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, लातूर येथील कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्राधिकारी तथा विभागीय गुणनियंत्रक बाबूराव मुंढे, जिल्हा कृषी विकास अधिकारी गोविंद दहिवडे, जिल्हा गुणनियंत्रक गोविंद काळे, पोलीस निरीक्षक एस. आर. साठे यांनी गोदामाची झडती घेतली असता. तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या विविध ग्रेडच्या खतांच्या ३१५ पिशव्या आढळून आल्या.

त्याची किंमत २ लाख ४० हजार २०० रुपये होते. या सर्व खतांचे नमुने खत परीक्षण प्रयोगशाळेत विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले. अवैध साठणुकीद्वारे गोविंद पवार (रा. आनंद नगर, ता. पाथरी) याने खत उत्पादन विक्री व साठणुकीचा परवाना न घेता खतसदृश वस्तू (खत) संशयास्पदरित्या व अनधिकृतरित्या शेतकऱ्यांना विक्री व वितरण करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने खतसाठा बाळगेलला आढळून आला. या प्रकरणी गोविंद पवार याच्या विरुद्ध खत नियंत्रण आदेशानुसार दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT