Fake Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Dhule Fake Cotton Seeds: धुळ्यात २१ लाखांचे अवैध कापूस बियाणे जप्त

Cotton Seed Seizure: कृषी यंत्रणांनी एका मोहिमेत धुळे शहर आणि तालुका परिसरातून सुमारे २१ लाख रुपयांचे बनावट कापूस बियाणे जप्त केले आहे. संबंधितांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे.

Team Agrowon

Dhule News: कृषी यंत्रणांनी एका मोहिमेत धुळे शहर आणि तालुका परिसरातून सुमारे २१ लाख रुपयांचे बनावट कापूस बियाणे जप्त केले आहे. संबंधितांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. विशेष पथकांनी एक चारचाकी आणि दोन ट्रॅव्हल्समधून अवैध कापूस बियाण्यांचा साठा पकडला.

धुळ्यातील शिरूर चौफुली परिसरात वाशिमहून येत असलेल्या एका चारचाकी वाहनामधून बियाणे जप्त करण्यात आले. तर, कमलबाई चौक परिसरात गुजरातहून येत असलेल्या दोन ट्रॅव्हल्स बसमधून कापूस बियाणे साठा हस्तगत करण्यात आला.

एका ट्रॅव्हल्स बसमधून कापूस बियाण्यांची ५० पाकिटे सापडली, तर अन्य एका ट्रॅव्हल्स बसमध्ये तब्बल १२०० अनधिकृत कापूस बियाणे पाकिटे आढळून आली. गुण नियंत्रण अधिकारी अरुण तायडे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

एका कंपनीचे अवैध देशी कापूस बियाणेदेखील सापडले आहे. जप्त केलेल्या कापूस बियाण्यांची किंमत अंदाजे २० ते २१ लाख रुपये असून, कृषी विभागाने याप्रकरणी दोषींवर कारवाई केली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी वेश बदलून ही कारवाई केली. अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT