Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Seed : दोनशे किलो चोरबीटी बियाणे जप्त

Cotton Seed : गोंडपिपरी येथील शिवाजी चौकातील दत्तू लोणारे यांच्या घरातून हा साठा जप्त करण्यात आला आहे.

Team Agrowon

Chandrapur News : जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात दोनशे किलो चोरबीटी बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. गोंडपिपरी येथील शिवाजी चौकातील दत्तू लोणारे यांच्या घरातून हा साठा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिवनी येथील अरविंद जुनारकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘अॅग्रोवन’मध्ये सीमावर्ती भागात शेतकरी चोरबीटीला नाही म्हणत असताना काही तस्करांकडून हा गोरखधंदा सुरू असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

गोंडपिपरी येथील शिवाजी चौकात वास्तव्यास असलेले दत्तूजी लोणारे यांच्या घरी चोरबीटी बियाण्यांचा मोठा साठा असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. याच घरातून चोरबीटी बियाण्यांची विक्री करीत असल्याचे माहिती मिळताच भरारी पथकाने धाड टाकली. याठिकाणी २५ किलोचे आठ असे एकूण दोनशे किलो चोरबीटी बियाणे आढळून आले.

याची किंमत तीन लाख रुपये आहे. हा संपूर्ण चोरबीटीचा साठा महाराष्ट्र तेलंगण सीमेवरील शिवनी गावातील अरविंद जुनारकर याचा असल्याचे माहितीद्वारे समोर आले. गोंडपिपरी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा, सीईओ पुलकित सिंग, पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, श्रावण बोढे यांच्या मार्गदर्शनात हत्तीगोटे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी मुरलीधर लट्ये यांनी ही कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT