Education Agrowon
ॲग्रो विशेष

Education : शालेय गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणे शिक्षक नेत्याला भोवले

Rural Education : शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणे शिक्षक संघटनेच्या नेत्याला भोवले आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणे शिक्षक संघटनेच्या नेत्याला भोवले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अचानक सबंधित शिक्षक नेत्याच्या शाळेला भेट दिली.

तेथील विद्यार्थी गुणवत्तेत कमालीचे मागे असल्याचे निदर्शनात आल्यावर येरेकर यांनी निलंबनाची कारवाई केली. अजून काही शिक्षक नेते सीईओंच्या रडावर असल्याचे समजते.

अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक संघटनेचे नेते राजेंद्र निमसे कार्यरत होते. शिष्यवृत्तीसह अन्य गुणवत्ता वाढीवर भर देणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अचानक निंबळक शाळेला दोन दिवसांपूर्वी भेट दिली.

शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तेबाबत अनेक बाबी विचारल्या असता मुलांची गुणवत्ता कमालाची ढासळल्याचे पाहायला मिळाले. यामुळे येरेकर चांगलेच संतापले. निमसे सतत शाळेत गैरहजर असल्याचे गावकऱ्यांनी सीईओंना सांगितले.

विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका सोडवता आली नाही. यावरून संबंधित शिक्षक नेत्याचे आपल्या शाळेकडे आणि वर्गाकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

याबाबतचे आदेश शनिवारी (ता. २६) नगर तालुका गटशिक्षण विभागाला पाठवण्यात आले असून निमसे यांना निलंबित करून निलंबन काळात त्यांचे मुख्यालय हे कोपरगाव करण्यात आले आहे.

शिक्षक नेते राजेंद्र निमसे यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. आणखी काही शिक्षक नेतेदेखील सीईओंच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

प्रशासनाला विरोध

जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवावे, अशी जिल्हा परिषद प्रशासनाची इच्छा आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत अधिक मुले सहभागी व्हावीत, त्यांच्याकडून मूळ परीक्षेआधी सराव परीक्षा घ्यावी याचे नियोजन केले आहे.

या सराव परीक्षेसाठी छोट्या शाळेतील मुले जवळच्या मोठ्या शाळेत नेण्याचे नियोजन होते. खासगी वाहनातून विद्यार्थी नेता येतात का अशी विचारणा करत शिक्षक नेत्यांनी विरोध केला. विरोध करणाऱ्यांत निमसे होते, अशी माहिती मिळतेय. विद्यार्थी हित पाहून प्रशासनाला विरोध करायला नको होता. हाच विरोध भोवला असल्याची चर्चा सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT