Agriculture Transformer Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : रोहित्र जळाले तर ‘महावितरण’ला कळवा; तातडीने दुरुस्ती करू

Team Agrowon

Solapur News : ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. पण ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची खबर १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

गावातील ट्रान्स्फॉर्मर जळाला, तर विद्युत पुरवठा खंडित होऊन गावकऱ्यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत.

त्यासाठी ट्रान्स्फॉर्मर ऑइल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्स्फॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्स्फॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो. या मोहिमेला यश आले असून, महावितरणला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात येत आहे.

तथापि, ट्रान्स्फॉर्मर जळाला आहे, हेच उशिराने समजले तर प्रत्यक्षात वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणला मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्स्फॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच वीज ग्राहकांना स्थानिक सोलापूर मंडल स्तरावरील संबंधित कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ९०२९१६८०२९ या क्रमांकावर खबर देता येईल. त्यासोबत ९०२९१६८०२९ या व्हॉट्सॲप नंबरवर जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरचा फोटो आणि ठिकाणाचा तपशील कळविता येईल, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT