ST Bus Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra ST Buses: सुविधा नसतील तर एसटीचे हॉटेलवरील थांबे बंद करा

Transport Minister Pratap Sarnaik: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यांवर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील, तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिले.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यांवर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील, तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिले.

या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्यांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक प्रवाशांसोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत.

या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसांत सादर करावा असेही ते म्हणाले.

हॉटेल-मोटेल थांब्यांवरून एसटीला मिळणारे उत्पन्न एक वेळ बुडाले तरी चालेल, परंतु प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT