Soil Health Card Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : जमिनीचे आरोग्य चांगले राहिले, तर पीक चांगले येईल

Soil Fertility : पीक वाढीचे मुख्य माध्यम म्हणजे माती आहे. पिकाला सर्व मुख्य घटक जमिनीतून मिळतात. जमिनीचे आरोग्य चांगले राहिले तर पीक चांगले येईल.

Team Agrowon

Beed News : पीक वाढीचे मुख्य माध्यम म्हणजे माती आहे. पिकाला सर्व मुख्य घटक जमिनीतून मिळतात. जमिनीचे आरोग्य चांगले राहिले तर पीक चांगले येईल. शेतकऱ्यांनी पिकांचे अवशेष जमिनीत कुजवावेत. रासायनिक खतांचा संतुलित वापर केला पाहिजे, असे मत अंबाजोगाईचे उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांनी व्यक्त केले.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र आंबेजोगाई यांच्या माध्यमातून शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम गुरुवारी (ता. ५) उजनी गावात जागतिक मृदा दिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी श्री. गायकवाड बोलत होते.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच माया गायकवाड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक कृषी विस्तार शिक्षण केंद्र अंबाजोगाईचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख, पिकविद्या शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले, कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांची उपस्थिती होती.

श्री. कर्डिले यानी प्रास्ताविक केले. या वेळी गावातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच खरीप हंगामात उत्कृष्ट काम केलेल्या गावातील अनंत गायकवाड, उत्तम माने व गोविंद गायकवाड या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. गायकवाड म्हणाले, की कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. त्यासाठी ऑनलाइन शेतकऱ्यांनी अर्ज करावा. यांत्रिकीकरण, फलोत्पादन, शेततळे यासारख्या विविध योजना राबवल्या जात असल्याच ते म्हणाले. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, की शेतकऱ्यांनी शेतीच्या समस्या व त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला पाहिजे.

घरात मातेचे आणि शेतात मातीचे आरोग्य चांगले पाहिजे, तरच कुटुंबाचा विकास साध्य होतो. डॉ. देशमुख म्हणाले, की मातीच्या आरोग्यासाठी पशुधन सांभाळले पाहिजे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. सूत्रसंचालन कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी केले. आभार वैजनाथ इंगोले यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT