Devanand Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : शेतकऱ्यांना मदत न केल्यास रस्त्यावर उतरू : पवार

Devanand Pawar : अवकाळी पावसाने शेतकरी उदध्वस्त झाला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारची लक्तरे शेतीच्या बांधावर टांगू,’’ असा इशारा प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : ‘‘अवकाळी पावसाने शेतकरी उदध्वस्त झाला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारची लक्तरे शेतीच्या बांधावर टांगू,’’ असा इशारा प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीकविम्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. राज्यात मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे. मात्र, काहींसाठी ही रक्कम म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे. शेतकऱ्यांची पीकविमा कंपनीकडून थट्टा केली जात आहे का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

पवार म्हणाले, ‘‘अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात २ रुपये, ५ रुपये, ३५ रुपये अशी तुटपुंजी मदत जमा करण्यात आली. सरकारचे डोके ठिकाणावर असते तर अशी मदत वितरित झाली नसती. आता गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तर उरलेसुरले कापसाचे पीक संपुष्टात आले आहे.

तुरीसह गव्हाचे सुद्धा नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने वेळ न घालविता तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी पवार यांनी केली. शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे तसेच उत्पादन खर्च वाढल्याने शेती नुकसानीची ठरत आहे.’’

उद्या घाटंजी येथे सोटे मोर्चा

‘‘कापसाला १२ हजार तसेच सोयाबीनला ८ हजार रुपये हमीभाव घोषित करावा. सरकार याकडे गंभीरपणे बघायला तयार नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत न दिल्यास हातात सोटे घेऊन सत्ताधाऱ्यांना प्रसाद देऊ. त्या पार्श्वभूमीवर घाटंजी येथे उद्या (ता. ३०) दुपारी सोटे मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात सहभागी व्हावे,’’ असे आवाहन पवार यांनी केले.

संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवतील.
- देवानंद पवार, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT