Onion Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : मोदींना कांदा प्रश्नांवर बोलेन; छगन भुजबळ यांचं कांदा उत्पादकांना आश्वासन!

लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची कांदा पट्ट्यात सभा आयोजित करण्यात आली आहे.

Dhananjay Sanap

नरेंद्र मोदींच्या सभेत मला संधी मिळाली तर कांदा प्रश्नावर बोलेल, किंवा मोदींना निवेदन देईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर दिली. भुजबळ पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक उद्ध्वस्त झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत कांदा प्रश्नांकडे लक्ष देत नाही.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची कांदा पट्ट्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी (ता.१५ रोजी) पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.

भुजबळ म्हणाले, "मला मोदींसमोर बोलण्याची संधी मिळाली कांदा प्रश्नावर नक्की बोलेन. स्टेजवर खुप नेतेमंडळी असतील. वेळही कमी असेल. त्यामुळे मला शांतपणे मोदींना भेटता आलं तर मी बोलेन किंवा लेखी निवदेन देईल." अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली. पुढे ते म्हणाले, "कांदा प्रश्नांवर कायमस्वरूपी मार्ग काढला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे." असंही भुजबळ यांनी सांगितलं.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार भारती पवार आहेत. दिंडोरी कांदा उत्पादकांचा मतदारसंघ आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर सहा महीने निर्यातबंदी घातलेली. निर्यातबंदी उठवली मात्र प्रतिटन ५५० किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे कांदा निर्यातीला ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू नये, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, मागच्या पंधरा वर्षात पिंपळगाव बसवंतला पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिसरी सभा आहे. कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांचे कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे आता सभा घेऊन शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांसाठी ३.१५ लाख कोटींची तरतूद

Aadhaar Authentication Farmers : आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची धावपळ

Soybean Bogus Seeds : गतवर्षी तक्रारी, यंदाही त्याच कंपन्यांचे बियाणे

Nachni Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाचणी लागवडीला प्रारंभ

Inter Cultivation Maharashtra : डवरणीला बैलजोडीचाच आधार

SCROLL FOR NEXT