Sambhaji Brigade agrowon
ॲग्रो विशेष

Sambhaji Brigade : कोट्यवधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन दहा वर्षांपासून धूळखात, संभाजी ब्रिगेडचं अनोख आंदोलन

Weighing Check Machine : हायड्रोलिक व्हॅनचा उपयोग वजनकाटे तपासणीसाठी करावा; अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला.

sandeep Shirguppe

Kolhapur Sambhaji Brigade : वजनकाटे तपासणीसाठी असलेली कोट्यवधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन दहा वर्षांपासून धूळखात पडली आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी हत्तीमहल रोडवरील वैधमापन शास्त्र विभागाचे कार्यालय गाठले. परंतु, या ठिकाणी सहाय्यक नियंत्रक दत्ता पवार उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी निवेदन त्यांच्या खुर्चीला चिकटवून निषेध केला.

यानंतर मोटारसायकल रॅलीद्वारे कार्यकर्त्यांनी ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात जाऊन या हायड्रोलिक व्हॅनची उपहासात्मक पूजा केली. हायड्रोलिक व्हॅनचा उपयोग वजनकाटे तपासणीसाठी करावा; अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला.

आंदोलनासंदर्भात कल्पना देऊनही आज सहाय्यक नियंत्रक पवार व सर्व निरीक्षक गैरहजर राहिले. यामुळे संतप्त आंदोलकांनी निवेदन त्यांच्या खुर्चीला चिकटविले. यानंतर आंदोलकांनी दसरा चौकात येऊन राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

येथून रॅलीद्वारे गोकुळ दूध संघ येथे जाऊन धूळ खात पडलेल्या व्हॅनची उपहासात्मक पूजा केली. आंदोलनात अभिजित कांजर, राहुल पाटील, शिवाजी गुरव, विक्रमसिंह घोरपडे, मारुती भोळे, महादेव कोईंगडे, विवेक मिठारी, अरुण पाटील व शेतकरी सहभागी झाले होते.

गोकुळचा हात असावा गोकुळच्या डेअरीमधील दूध अचूक मोजावे, यासाठी लढा उभारला आहे. मात्र, याला गोकुळ खोडा घालत आहे. कारखान्यांसह मोठे खासगी वजन काटे तपासणारे व्हॅनही गोकुळ कार्यालय आवारातच लपवून ठेवल्याचा योगायोग नसावा, असाही आरोप रूपेश पाटील यांनी केला.

गोकुळचा पाठपुरावा

वाढीव इमारतीचे बांधकाम करावयाचे आहे. त्यामुळे क्रेन व्हॅन दुसरीकडे शासकीय जागेत पार्क करावी, अशी पाच पत्रे २०२१ पासून गोकुळच्या कार्यकारी संचालकांनी वैधमापनशास्त्राच्या सहायक नियंत्रकांना दिले आहेत. मात्र, ही पत्रेही बेदखल केली आहेत, असे गोकुळच्या प्रशासनाचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT