Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Crushing Season : कोल्हापुरात गळीत हंगामाची लगबग

Sugarcane Update : यंदा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत साखर हंगाम सुरू झाला आहे. काही कारखान्यांनी गेल्या दोन दिवसांपासून तोडी दिल्या आहेत. पण बहुंताश कारखान्यांची तोडणी यंत्रणाच आलेली नाही.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत साखर हंगाम सुरू झाला आहे. काही कारखान्यांनी गेल्या दोन दिवसांपासून तोडी दिल्या आहेत. पण बहुंताश कारखान्यांची तोडणी यंत्रणाच आलेली नाही.

राज्यात सर्वच जिल्ह्यांत एकाच दिवशी विधानसभेचे मतदान आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बीड, धाराशिव, लातूर आदी भागांतून तोडणी मजूर येतात. त्या जिल्ह्यातही मजूर प्रचारात किंवा शेतीच्या मशागतीत व्यस्त असल्याने अजून बऱ्याच कारखान्यांत यंत्रणाच आलेली नाही. तथापि, सर्वच कारखान्यांनी बॉयलर पेटवून मुहूर्तावर मोळी टाकली आहे. हंगामाला वेग मात्र विधानसभा निवडणुकीनंतरच येईल, अशी शक्यता आहे.

हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयांकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. यासाठीचे ऑनलाइन प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाला पाठवल्यानंतर या कार्यालयाकडून परवाने अटीशर्ती पूर्ण केल्यानंतर दिले जातात.

कारखान्यांची यंत्रणाही निवडणूक कामात व्यस्त

प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर अनेक कारखान्यांचा परिसर मजुरांमुळे फुलून जातो. सध्या थोड्या प्रमाणात मजूर येत असले तरी कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जितके मजूर अपेक्षित आहेत तितके आलेले नाहीत.

कारखान्यांची यंत्रणा पूर्णपणे निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. कारखान्यांचे तांत्रिक विभाग सोडले तर अन्‍य सर्व कर्मचारी निवडणुकीच्या मोहिमेत असल्याने सध्या अनेक कारखानेही शुकशुकाट अनुभवत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Update : राज्यात हलक्या पावसाची शक्यता; तापमानात चढ उतार शक्य

Ajit Pawar : पंतप्रधान मोदींकडे राज्यातील योजनांसाठी मागितला केंद्राचा निधी ः अजित पवार

Maharashtra Election 2024 : महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरांच्या मतविभाजनाची चिंता

Crop Damage : कोल्हापुरात जोरदार पाऊस; भात, भुईमूग पिकांचे नुकसान

Maharashtra Voting : मतदानापूर्वीच्या ४८ तासांसाठी निर्बंध जारी

SCROLL FOR NEXT