Farmer Hunger Stirke Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Hunger Strike : बावीच्या शेतकऱ्यांचे उपोषण

Upsa Irrigation Scheme : सिना माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्यात यावे या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती बावी च्या वतीने नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर साखळी उपोषण सुरू केले आहे.

Team Agrowon

Solapur News : माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, पिंपळखुंटे या गावांचा सिना माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्यात यावे या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती बावी च्या वतीने ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मागण्या जाणून घेतल्या.

बावीसह अन्य गावे ही कायम दुष्काळी पट्ट्यात असून, गावांना पाण्याची दुसरी कोणतीही सोय नाही. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पाणी संघर्ष समिती बावीने वेळोवेळी आमदार, खासदार, जलसंपदामंत्री, अधिकाऱ्यांना या गावांचा समावेश सिना-माढा उपसा सिंचन योजनेत करण्याची मागणी केली होती.

त्यावर मंत्रालयात ४ ते ५ बैठकाही झाल्या. जलसंपदा मंत्र्यांनी ही गावे समावेश करण्याचे निर्देश हि ता.३१ जानेवारीला दिले, परंतु, शासनाचे घोडे कोठे अडले आहे ते कळेना. अधिकारी समावेशनाचे पत्र काय काढेनात.

या कारभाराला वैतागून पाणी संघर्ष समिती बावीच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. याठिकाणी जिल्हा दुध संघाचे संचालक शंभुराजे मोरे, मुन्नाराजे मोरे, पाणी संघर्ष समिती बावीचे अध्यक्ष सुरज मोरे, उपाध्यक्ष परशुराम मोरे, सचिव परेश मोरे,

सहसचिव रोहित मोरे कार्याध्यक्ष संतोष मोरे, उदय मोरे, अमित मोरे, निखील मोरे, शरद मोरे, दिगंबर माळी, आप्पासाहेब ढेकळे, अण्णा मोरे, भारत मोरे, प्रदीप मोरे, संजय गोरख आदी उपस्थित आहेत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT