Banana  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Seedling : खानदेशात केळी रोपांना मोठी मागणी

Banana Cultivation : खानदेशात मृग बहरात लागवडीसंबंधी उतिसंवर्धित केळी रोपांची मोठी मागणी आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात मृग बहरात लागवडीसंबंधी उतिसंवर्धित केळी रोपांची मोठी मागणी आहे. काही कंपन्यांची रोपांसंबंधीची आगाऊ नोंदणी पूर्ण झाली आहे. अर्थात, पुढे केळी लागवड काहीशी वाढेल, असेही संकेत आहेत.

केळी पिकाचा समावेश रोजगार हमी योजनेत केल्याने लागवडीपासून ते काढणीपर्यंत अनुदान मिळणार आहे. तसेच केळी वगळता इतर पिकांचे दर मागील काही महिने अल्पच आहेत. इतर पिकांत नफा नाही.

यामुळे अनेकांनी केळी लागवडीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात बारमाही केळीची लागवड केली जाते. त्यात मृग बहर व आगाप मृग बहर लागवड अधिक असते. ही लागवड यंदा ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक राहील, असे दिसत आहे. आगाप मृग बहर लागवड एप्रिल ते मे महिन्यात केली जाते. तसेच नियमित लागवडी जून व जुलैत केल्या जातात. काही शेतकरी उशिराच्या लागवडीसही पसंती देतात.

ही लागवड ऑगस्टमध्येही केली जाते. तसेच कांदेबाग केळीची लागवडदेखील खानदेशात यंदा काहीशी वाढेल, असे दिसत आहे. ही लागवड चोपडा, जळगाव, जामनेर, यावल, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर भागात अधिक असते. ही लागवडदेखील एकूण २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक राहील, असे दिसत आहे.

सध्या केळी कंदांचाही तुटवडा आहे. अर्थात, खानदेशात केळीची एकूण लागवड ७० हजार हेक्टरपेक्षा अधिक असणार आहे. यात रोपांचाही मोठा वापर लागवडीसाठी केला जाईल, असे दिसत आहे.

रोपांना नऊ ते १६ रुपयांपर्यंत दर

पुढे मृग बहरात लागवडीसाठी सुमारे तीन कोटी उतिसंवर्धित रोपांची आगाऊ नोंदणी खानदेशात झाली आहे. एकूण आठ कंपन्या खानदेशात केळी रोपांचा पुरवठा करतात. सर्वच कंपन्यांकडे केळी रोपांसंबंधीची आगाऊ नोंदणी सुरू आहे.

रोपांची मागणी अधिक व उत्पादन खर्च ही बाब लक्षात घेता काही कंपन्यांनी रोपांचे दर एक रुपयांनी वाढविले आहेत. हे दर पुढे मृग बहर हंगामासाठी लागू असतील. विविध कंपन्यांचे केळी रोपांचे दर नऊ रुपयांपासून ते १६ रुपयांपर्यंत आहेत. सध्या केळी रोपांची लागवड जळगाव, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर भागांत सुरू आहे, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT