महाराष्ट्रात रब्बी हंगामातील (Rabbi Season) जवस (Linseed) हे महत्त्वाचे तेलबिया पीक असून, त्याचा तेल व धागा निर्मितीसाठी उपयोग होतो. जवस हे अलीकडच्या काळात सुपर फूड (Super Food) म्हणून पुढे येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यातील अधिक प्रमाणात असलेले ओमेगा-३, स्निग्ध आम्ल, लिग्नीन, तंतुमय पदार्थांचे आरोग्यास असलेले फायदे.
हृद्यासंबंधित आजार, रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण, मधुमेह, कर्करोग, अस्थिरोग आणि मज्जासंस्थेवरील आजारावर जवस उपयुक्त आहे. जवसाला आळशी असेही म्हणतात. भारतात मध्य प्रदेश राज्यात जवसाचे जास्त क्षेत्र व उत्पन्न असून त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक व पश्चिम बंगालचे क्षेत्र आहे.
चटणी, चिक्की या अन्नपदार्थांमध्ये जवसाचा वापर करून त्यांचे आहारातील प्रमाण वाढवून त्यापासून मिळणारे अनेक आरोग्यदायी फायदे घेता येतात. पूर्वी जवसाची पूड करून भाजीत टाकली जायची. सध्या जवसाचा वापर बंद झाला आहे.
दररोज नियमित एक चमचा जवस किंवा त्याची पूड करून सेवन केले पाहिजे. व्यवसायिक दृष्टीने जवस फूड कॅप्सूल, टॅबलेट, जवस पीठ या पदार्थांच्या रूपात उपलब्ध आहे.
जवसातील पोषन मूल्य पाहता जवस, राजगिरालाही, गुळ, मध, इलायची आणि गवार डिंक या सर्व घटकांचा वापर करून जवस न्यूट्रा लाडू तयार करता येतात.
जवस न्युट्रा लाडू तयार करण्यासाठी जवस चांगले भाजून त्याची पूड तयार करावी. यामध्ये राजगिरालाही, गूळ, गवार डिंक, मध आणि विलायची पूड मिसळून लाडू बांधावेत. हे लाडू हवाबंद पद्धतीने पॅक करावेत.
ज्याप्रमाणे बुंदी, बेसन, खोबरे आणि डिंकाचे लाडू बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तसेच आरोग्यदायी जवसाचे लाडू तयार करून बाजारामध्ये आणले पाहिजेत.
न्यूट्रा लाडू पासून २८.१ टक्के प्रथिने, ४२.३ टक्के स्निग्धांश, १९.६ टक्के कार्बोदके, ४.२ टक्के राख, ६.८ टक्के तंतु आणि ५७१.४ किलो कॅलरी ऊर्जा मिळते.
जवसाच्या झाडापासून मिळणाऱ्या तंतूचा उपयोग कापड व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे कागद तयार करण्यासाठी व शोभेच्या वस्तू निर्मितीकरिता होतो. जवसाच्या तंतूपासून पक्के दोरखंड, पोते, पिशव्यांची निर्मिती केली जाते.
पूर्वीपासून जवसाच्या तेलाचा उपयोग तेलरंग, वार्निश, साबण, छपाईची शाई, वंगण, मलम, चमड्याच्या पॉलिशसाठी होतो. जवसाच्या पेंढीचा उपयोग पशू खाद्यात केला जातो.
जवसाच्या तेलाचा उपयोग बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, फळांचे रस, नूडल्स अशा अनेक खाद्यपदार्थांमध्ये त्यांची पोषण तत्त्वे वाढविण्यासाठी केला जातो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.