Green Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Green Fodder : प्रथिनयुक्त पौष्टिक हिरव्या चाऱ्यासाठी चवळी लागवड

Cowpea Fodder : जनावरांना हिरवा चारा देत असताना त्यात एकदल आणि द्विदल असा दोन्ही प्रकारचा चारा असला पाहिजे. द्विदल चारा पिकाचा विचार केला तर लसूण घास, बरसीम या चारा पिकांप्रमाणेच चवळी हे द्विदल वर्गातील भरपूर प्रथिने असलेलं पीक आहे.

Team Agrowon

Animal Care : जनावरांना हिरवा चारा देत असताना त्यात एकदल आणि द्विदल असा दोन्ही प्रकारचा चारा असला पाहिजे. द्विदल चारा पिकाचा विचार केला तर लसूण घास, बरसीम या चारा पिकांप्रमाणेच चवळी हे द्विदल वर्गातील भरपूर प्रथिने असलेलं पीक आहे.

चवळी पिकापासून उत्तम प्रतिचा रूचकर व पौष्टिक चारा मिळतो. ज्यामध्ये प्रथिनांच प्रमाण १३ ते १५ टक्के असतं. याशिवाय चवळी द्विदल वर्गातील पीक असल्यामुळे पिकाच्या मुळावर गाठी असतात. रायझोबियम जिवाणूंच्या गाठी हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीत साठवतात. त्यामुळे जमिनीचा पोत व सुपीकता सुधारण्यासही मदत होते. त्यामुळे आपल्याकडील जमीन, हवामान व पाण्याच्या उपलब्धता लक्षात घेऊन चवळीची पेरणी करावी.   

वाण

चवळीची पेरणी उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत करता येते. चवळी चारा पिकाच्या सुधारित वाणांमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय चारा पीक संशोधन प्रकल्पाने ‘श्वेता’ या वाणाची शिफारस राज्यस्तरावर केलेली आहे. श्वेता या सुधारित वाणाला भरपूर हिरवी, रूंद पाने लागतात.  ही हिरवी पाने फूलधारणेपासून शेंगा पक्क्या होईपर्यंत टिकून राहतात.  या वाणापासून उत्तम प्रतिचा हिरवा चारा मिळवता येतो.       

लागवड तंत्र

चवळी च्या पेरणीसाठी हेक्टरी ४० - ४५ किलो भेसळ विरहीत न फुटलेले, टपोरे व शुध्द बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ‘रायझोबियम’ चोळावे.       

बियाणे पेरणीपूर्वी हेक्टरी २० किलो नत्र म्हणजेच ४३ किलो युरिया व ४० किलो स्फुरद म्हणजेच २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून द्यावे. पेरणीनंतर लगेच एक पाणी द्याव. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी दुसरे आंबवणीचे पाणी दयावे. उन्हाळी हंगामात ७ ते ९ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.       

पिकांच्या दोन ओळींमधील जमीन हातकोळप्याने कोळपून घ्यावी. बियाणे पेरणीनंतर २१ - २५ दिवसांनी एक खुरपणी करून पीक तणविरहीत ठेवाव. चवळीचे वेल उंच व दाट वाढत असल्याने पीक वाढीच्या काळात जमीन झाकली जाऊन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.       

चवळी पिकाची कापणी पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असतांना केल्यास सकस हिरव्या चाऱ्याचे भरपूर उत्पादन मिळतं.  अशा या चवळीपासून प्रति हेक्टरी २५० ते ३२० क्विंटल हिरवा चारा मिळतो. त्यामुळे तुम्हीही चारा पिकाची लागवड करणार असाल तर चवळी पिकाचा नक्की विचार करा. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT