Banana Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Processing : केळीपासून कसे बनवले जाते पावडर, प्युरी, चिप्स?

Banana Processing Market: केळी हे उत्तम शक्तिवर्धक, पचनास हलके व औषधी गुणधर्मयुक्त फळ आहे. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे.

Team Agrowon

करिश्‍मा कांबळे

Banana Processing Products : वर्षभर उपलब्ध असणारे, बिया नसलेले आणि सहज उपलब्ध होणारे फळ म्हणून केळीस (banana) ओळखले जाते. केळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे प्रक्रिया करून केळीचा साठवण कालावधी वाढविणे शक्य होते.

केळी हे उत्तम शक्तिवर्धक, पचनास हलके व औषधी गुणधर्मयुक्त फळ आहे. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे.

काढणीपश्‍चात होणारे नुकसान टाळण्यासाठी केळीवर प्रक्रिया करणे फायदेशीर ठरते. केळीपासून चिप्स व्यतिरिक्त केळी प्युरी, पल्प, जॅम, जेली, पावडर असे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.

१) पावडर

केळीची पावडर मिल्क शेक आणि बेबी फूडमध्ये वापरली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे केक आणि बिस्कीट बनविण्यासाठी देखील केळी पावडरचा वापर केला जातो. केळीची पावडर बनविण्यासाठी कच्च्या केळीचा वापर केला जातो.

कृती

प्रथम केळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर मंद आचेवर गरम पाण्यामध्ये १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावीत. यामुळे केळीचा रंग चांगला टिकून राहतो. शिजवल्यानंतर केळी थंड होण्यास ठेवून द्यावीत. नंतर साल काढून घ्यावी.

त्यानंतर गोल चकत्या कापून त्या ड्रायरमध्ये ८ तासांसाठी वाळवून घ्याव्यात. वाळलेल्या चकत्या ग्राइंडरमधून फिरवून घ्याव्यात. तयार झालेली पावडर डब्यात हवाबंद करून साठवून ठेवावी.

२) चिप्स

चिप्स बनवण्यासाठी कच्च्या केळीचा वापर केला जातो. प्रथम केळी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. नंतर त्याच्या बारीक चकत्या कापून घ्याव्यात. या चकत्या गरम पाण्यामध्ये १० ते १५ मिनिटांसाठी ठेवून द्याव्यात.

१५ मिनिटानंतर चकत्या पाण्यातून काढून थंड होण्यास ठेवून द्याव्यात. चकत्या थंड झाल्यानंतर वाळण्यासाठी ठेवाव्यात. म्हणजे तेलामध्ये तळताना त्यात जास्त तेल शोषले जाणार नाही. चांगल्या वाळलेल्या चकत्या चकत्या वनस्पती तेलामध्ये परतून (फ्राय) करून घ्याव्यात.

तयार केळी चिप्सला चवीनुसार मसाले, मीठ, साखर किंवा इतर पदार्थांचे कोटिंग करता येते. १०० ग्रॅम चिप्ससाठी मसाले किंवा मीठ ८ ग्रॅम प्रमाण कोटींग करण्यासाठी वापरता येते.

३) प्युरी

प्युरीसाठी व्यवस्थितरीत्या पिकलेली केळी घ्यावीत. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. मंद आचेवर गरम पाण्यामध्ये १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावीत. त्यामुळे केळी मऊ होतात. गरम केळी थंड होण्यास ठेवून द्यावीत.

नंतर त्यावरील साल काढून घ्यावी. ही केळी ग्राइंडरमधून फिरवून घ्यावीत. तयार झालेली प्युरी फ्रीजमध्ये साठवून ठेवता येते. या प्युरीचा वापर जॅम बनविण्यासाठी करता येतो.

५) जॅम

साहित्य

केळी पल्प किंवा लगदा १०० ग्रॅम, पाणी १३० मिलि, पेक्टिन १ ग्रॅम, साखर ७५ ग्रॅम, सायट्रिक आम्ल २ ग्रॅम.

कृती

एक भांड्यात केळी पल्प घेऊन त्यात पाणी, साखर (अर्धे प्रमाण), पेक्टिन आणि सायट्रिक आम्ल टाकून मंद आचेवर चांगले शिजवून घ्यावे. मिश्रण शिजत अधूनमधून हलवत राहावे, जेणेकरून मिश्रण करपणार नाही.

मिश्रणात उरलेली साखर आणि सायट्रिक आम्ल मिसळून घ्यावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८.५० डिग्री ब्रिक्स झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे. तयार जॅम हवाबंद काचेच्या बरणीमध्ये १० महिन्यापर्यंत टिकून राहतो.

करिश्‍मा कांबळे, ८४५९३७४६८४, (अन्न तंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT