River Conservation
River Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

River Cleaning : या संस्थेने नदी पुनरुज्जीवनचा ध्यास कसा घेतला ?

माणिक रासवे

हिंगोली जिल्ह्यात कृषिकेंद्रित ग्राम विकासाचे (Rural Development) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उगम (Ugam Gramin Vikas Sanstha) ही स्वयंसेवी संस्था पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे. ‘उगम'ने जिल्ह्याची जीवन वाहिनी कयाधू नदी, तसेच तिच्या काठची गवत परिसंस्था पुनरुज्जीवनासाठी लोकचळवळ उभी केली आहे. शेतकऱ्यांच्या सहभागातून स्थानिक गवताच्या लुप्त होणाऱ्या प्रजातीसह जैवविविधतेचे संवर्धन (Biodiversity Conservation) केले जात आहे.

गवत उत्पादनातून शाश्‍वत उत्पन्न मिळू शकते, हे संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. पुनरुज्जीवनानंतर कयाधू नदी पूर्वीप्रमाणे वर्षातील बाराही महिने वाहती राहील. सिंचित शेतीमुळे शेतकऱ्यांची भरभराट होईल. अडीचशे गावांचा कायापालट होऊ शकतो.

‘उगम'चे संस्थापक अध्यक्ष जयाजीराव पाईकराव यांचा जन्म कयाधू नदी काठी वसलेल्या कंजारा (ता. कळमनुरी) येथील भूमिहीन शेतमजूर कुटुंबात झाला.

पुढील काळात सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मराठवाडा इको ग्रुपमध्ये पाईकरावदेखील होते. दरम्यानच्या काळात त्यांनी कयाधू संस्था सोडली. त्यांनी १९९६ मध्ये स्वतःची उगम ग्रामीण विकास संस्था स्थापन केली. हिंगोली- कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावरील उमरा फाटा येथे संस्थेचे मुख्यालय आहे.

गवत परिसंस्थेचे पुनरुज्जीवन

राज्य शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, भारतीय शिक्षण व संशोधन संस्था यांच्यातर्फे महाराष्ट्र जनुक कोष (महाराष्ट्र जीन बँक) कार्यक्रम २००७-०८ मध्ये राबवण्यात आला. त्याअंतर्गत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली देशात तसेच महाराष्ट्रात दुर्मीळ, दुर्लक्षित परिसंस्थांच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू झाले. गवत या दुर्लक्षित परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी उगम संस्थेची निवड करण्यात आली. पूर्वीच्या परभणी जिल्ह्यातील हिंगोलीचा परिसर हा गवताचे आगार म्हणून ओळखला जायचा...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT