Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

100 Ton Sugarcane Production : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा वार्षिक स्नेह मेळावा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा १४ वा वार्षिक स्नेह मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त कारखान्याशी निगडित शेतकरी, कर्मचारी, परिसरातील सामान्य जनांच्या मंगलमय आयुष्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शेतकरी बांधव, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी बांधव असे ५१ जोडप्यांच्या हस्ते संकल्प महायज्ञ करण्यात आला. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, श्रीसद्‌गुरू शांतिनाथजी महाराज संकल्प महायज्ञ कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांना शुभाशीर्वाद दिले. या वेळी प्रमुख अतिथी, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा सत्कार करण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले, की पुढील वर्षीच्या ऊस गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याची क्षमता ७५०० टन प्रति दिन इतकी करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटणार आहे. येणाऱ्या हंगामात दैनंदिन ५ हजार टन चालविण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारणी केली आहे. शेतकी विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडेसे बदला, आडसाली उसामध्ये एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या २३ आणि खोडवा पिकामध्ये एकरी ७५ हून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्याध्यक्ष विकास रासकर यांनी प्रास्ताविक केले. तर योगेश ससाणे यांनी आभार मानले.

नाना केरू वडघुले ऊस श्री
आडसाली उसामध्ये कारखान्याच्या व डीएसटीए पुणे संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित ऊस विकास योजनांचा प्रभावीपणे वापर करून नाना केरू वडघुले (टाकळी भीमा) यांनी एकरी ११४.२३४ टन ऊस उत्पादन मिळविले. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मानाचा ऊस श्री पुरस्कार आणि महिला शेतकरी अलका शहाजी चोंधे यांनी खोडवा ऊस पिकामध्ये एकरी ७८.२२० टन उत्पादन मिळविले. त्याबद्दल त्यांना ऊस लक्ष्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


शंभर टनांचे मानकरी
एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्यामध्ये संतोष कुलाळ (वडगांव बांडे), राजेंद्र मेमाणे (वडगाव बांडे), श्‍वेताली कड (केडगाव), ज्ञानेश्‍वर मगर (दहिटणे), किसन शिंदे (राहू), तानाजी मेमाणे (वडगाव बांडे), दशरथ टेळे (टेळेवाडी), राजेंद्र कदम (खुटबाव), सोमनाथ शिंदे (राहू), अनिल जांभुळकर (लडकतवाडी), आबासो टेळे (टेळेवाडी), अजय शितोळे (रांजणगांव सांडस), प्रवीण जगताप (राहू), सुनील कुंभार (रांजणगाव सांडस), राहुल अवचट (यवत स्टेशन), तानाजी हंबीर (पाटेठाण), दीपक ताम्हाणे (भरतगाव), नागेश कोंडे (वढू खुर्द), रमणलाल लुंकड (वडगाव रासाई), अशोक डुकरे (वढू खुर्द), खोडवा ऊस पिकामध्ये ७५ टनांहून अधिक ऊस गणेश वायकर (पिंपरी सांडस), सुनीता थोरात (नाथाचीवाडी) अशा प्रगतिशील शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यांना डीएसटीएचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. चव्हाण व सहकारी शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT