PDKV Akola  Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Akola : भरघोस उत्पादकतेबद्दल शेतकऱ्यांचा सन्मान

Agriculture Productivity : कृषी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांत या गावांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याच उद्देशाने या गावात दरवर्षी पीकस्पर्धा राबविण्यात येत असते.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने विदर्भातील अकरा जिल्ह्यांतील प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्यात आले. कृषी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांत या गावांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे.

त्याच उद्देशाने या गावात दरवर्षी पीकस्पर्धा राबविण्यात येत असते. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रथम आणि द्वितीय क्रमांक येणाऱ्या शेतकऱ्यांचा विद्यापीठात सत्कार करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, आत्मा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनात मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येतो.

परंतु या वर्षी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे निधन झाल्याने तो कार्यक्रम शासकीय दुखवटा असल्याने रद्द करण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी (ता. १४) उद्यानविद्या दिवसाच्या कार्यक्रमात या शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.

यात अकोला जिल्ह्यातील अर्चना रामेश्वर उंडाळ यांनी पिडिकेव्ही अंबा या सोयाबीन वाणाचे एकरी १३ क्विंटल साठ किलो उत्पन्न आणि महादेव वामन अरबाड यांनी पिडिकेव्ही सुवर्ण सोया सोयाबीनचे एकरी १० क्विंटल उत्पन्न विद्यापीठाचे मार्गदर्शनाखाली घेतल्याने त्यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक जाहीर केला.

विद्यापीठाच्या वतीने डॉ. एच. पी. सिंग (पूर्व उपमहासंचालक, उद्यानविद्या), हिवरे बाजार येथील माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विदर्भातील उर्वरित दहा जिल्ह्यांमधील पीक स्पर्धेत विजेता ठरलेल्यांचाही अशाच प्रकारे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT