Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Rotation : पीक फेरपालटची कास धरा : ठोंबरे

Rameshwar Thombare : येत्या खरिपात कापूस पिकास पर्याय म्हणून तूर पिकाची लागवड करावी, असे आवाहन विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : कापूस एके कापूस पीक सतत घेत असल्यामुळे त्या पिकापासून अपेक्षित उत्पादन येत नाही. पिकांची मुळे ही ठरावीक थरापर्यंत जातात आणि वारंवार त्याच थरातील अन्नद्रव्ये घेतात.

असे सतत कापूस पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्वी प्रमाणे अपेक्षित उत्पादन येत नाही ही स्थिती संभाजीनगर जिल्ह्याची झाली आहे. त्यामुळे येत्या खरिपात कापूस पिकास पर्याय म्हणून तूर पिकाची लागवड करावी, असे आवाहन विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी केले.

गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे ऊस व कापूस पीक लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आयोजित पीक परिसंवाद कार्यक्रमात श्री. ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. श्री. ठोंबरे म्हणाले, की गणेशवाडी गाव गोदावरी काठी असल्याने पाण्याची मुबलकता आहे.

पण अति पाण्याच्या वापर केल्यामुळे जमिनी खराब होत असतात याचाही विचार होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून ऊस आणि कापूस हीच दोन पिके शेतकरी घेतात. आता तुरी सारखे पीक घेणे या शेतशिवारासाठी गरजेचे झाले आहे.

बागायती शेतीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी निर्मित केलेले गोदावरी हे दाण्याचा रंग पांढरा असलेले वाण उत्तम आहे. येत्या खरिपात विद्यापीठाच्या वतीने या वाणाचे बियाणे अवश्य उपलब्ध करणे विषयी नक्कीच काळजी घेतली जाईल, असे शेवटी सांगितले.

या परिसंवादाचे सूत्रसंचालन चेतन देवतळे यांनी केले. आभार किरण शिंदे यांनी मानले. या परिसंवादात गणेशवाडी आणि अमळनेर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT